ताज्या घडामोडी

सांगली जिल्ह्यात आजअखेर 78 रूग्ण कोरोनामुक्त सद्यस्थितीत उपचाराखाली 57 रूग्ण : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : सांगली जिल्ह्यात आज दुपारी 1 वाजेपर्यंत 11 रुग्ण कोरोणाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात आज अखेर 78 रुग्ण कोरोणामुक्त झाले असून उपचाराखालील रुग्णांची संख्या 57 झाली आहे. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एकूण 139 रुग्ण कोरोणाबाधित ठरले आहेत. उपचाराखाली असलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी पाच रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
आज कोरोना बाधित झालेल्या रुग्णांमध्ये आटपाडी तालुक्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथील 38 वर्षाचा पुरूष, शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 75 वर्षाची महिला (पॉझीटीव्ह रूग्णाची पत्नी), कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील 50 वर्षाची स्त्री, शिराळा तालुक्यातील काळुखेवाडी येथील 40 वर्षाची स्त्री (मणदूर येथील पॉझीटीव्ह रूग्णाची मुलगी), कवठेमहांकाळ तालुक्यातील खरसिंग येथील मुंबईवरून आलेला 21 वर्षाचा पुरूष, तासगाव तालुक्यातील वायफळे येथील ठाणे वरून आलेला 19 वर्षाचा पुरूष, खानापूर तालुक्यातील कुर्ली येथील मुंबईवरून आलेला 35 वर्षाचा पुरूष, मिरज तालुक्यातील मालगांव येथील पनवेल वरून आलेली 50 वर्षाची महिला, खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथील 55 वर्षाची महिला (पॉझीटीव्ह रूग्णाची पत्नी), जत येथील 35 वर्षाचा पुरूष (खलाटी पॉझीटीव्ह रूग्णाचा सहवासीत). आजअखेर ग्रामीण भागातील पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या 99 असून शहरी भागातील 29 तर महानगरपालिका क्षेत्रातील पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या 11 इतकी आहे.
पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथील पॉझीटीव्ह आलेला 60 वर्षाचा रूग्ण नॉनइन्व्हेजीव व्हेंन्टिलेटरवर ठेवण्यात आला आहे. औंढी तालुका जत येथील 55 वर्षीय पुरुष सद्यस्थितीत इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला असून सदर रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. कडेबिसरी (सांगोला, सोलापूर) येथील 48 वर्षाच्या पुरूष रूग्णाला ऑक्सिजनवर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे. खिरवडे (शिराळा) येथील 56 वर्षाच्या पुरूष रूग्णावर सद्यस्थितीत नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे. मणदुर (शिराळा) येथील 81 वर्षाच्या पुरूष रूग्णास नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला असून रूग्णाची स्थिती स्थीर आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close