ताज्या घडामोडी

भल्या माणसा एकदा तरी. . .पोलिस होऊन बघ..!

स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष करून, दुसऱ्याला न्याय देत बसून बघ, स्वतःच्या आई-वडिलांची हॉस्पिटलमध्ये सेवा न करता,
आरोपीची सेवा करून बघ
*अरे भल्या माणसा एकदा तरी. . पोलिस होऊन बघ.. . .*

स्वतःच्या मुलांना दुर्लक्षित करून, दुसऱ्याच्या मुलांना आपली मुलं समजून खेळवत बस,
हरवलेल्या मुलांना शोधुन,
आपल्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराला न जाता,
एखाद्या अनोळखी व्यक्तीचा अंत्यसंस्कार स्वखर्चाने करून बघ,
*अरे भल्या माणसा एकदा तरी. . . पोलिस होऊन बघ*

स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून आरोपीचे मेडिकल करून त्याच्या तब्येतीची दखल घेत बस,
दुसऱ्यांना वेळेवर जेवता यावे यासाठी, स्वतः रस्त्यावर थांबून बघ आणि स्वतः मात्र अवेळी जेवून स्वतःची शारीरिक क्षमता कमी करून घेऊन बघ,
*अरे भल्या माणसा एकदा तरी. . . पोलिस होऊन बघ*

चोवीस तास नोकरी करून वरिष्ठांचे बोल खाऊन बघ,
कितीही केलं तरी असमाधानी व्यक्तीत राहून बघ,
आपल्या घरात वाद-विवाद होऊनही दुसऱ्याच्या घरातील वाद मिटवत बस, आपल्या कुटुंबाची सोडून सर्वांची काळजी करत बस,
*अरे भल्या माणसा एकदा तरी. . . पोलिस होऊन बघ*

-अतुल जगदीश माळी.
पोलिस नाईक, सांगली पोलिस
☎️7798202877☎️

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close