महाराष्ट्रसांगली

आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी (जाधव मळा) येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी (जाधव मळा) येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे – आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी (जाधव मळा) येथील 1) आंबेवाडी (जाधव मळा) चे पूर्व – कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते सुबराव पांडुरंग जाधव यांचे घर 2) आंबेवाडी (जाधव मळा) चे पश्चिम – कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते माणिक पांडुरंग जाधव यांचे घर 3) आंबेवाडी (जाधव मळा) चे दक्षिण – कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते सदाशिव पांडुरंग जाधव यांचे घर 4) आंबेवाडी (जाधव मळा) चे उत्तर – कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते दादासो मारूती जाधव यांची शेत जमीन, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे – 1) आंबेवाडी (जाधव मळा) चे पूर्व – कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते आंबेवाडीच्या ओढ्यापर्यंत 2) आंबेवाडी (जाधव मळा) चे पश्चिम – कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते मोहन रघुनाथ जाधव यांचे घर 3) आंबेवाडी (जाधव मळा) चे दक्षिण – कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते शंकर दामू चव्हाण यांचे घर 4) आंबेवाडी (जाधव मळा) चे उत्तर – कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते जाधव मळा लगतचा आंबेवाडी रस्ता.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close