ताज्या घडामोडी

आटपाडी येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : आटपाडी तालुक्यात आटपाडी येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे – आटपाडी येथील 1) आटपाडी गावाचे पूर्व – राजाराम बापू हायस्कूल इमारत ते राजाराम बापू हायस्कूल संरक्षक भिंत 2) आटपाडी गावाचंे पश्चिम – राजाराम बापू हायस्कूल इमारत ते सोमेश्वर ऑटोपार्ट इमारत 3) आटपाडी गावाचे दक्षिण – राजाराम बापू हायस्कूल इमारत ते राजाराम बापू हायस्कूल संरक्षक भिंत 4) आटपाडी गावाचे उत्तर – राजाराम बापू हायस्कूल इमारत ते एम वाय पाटील यांचे घर व दवाखाना, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे – 1) आटपाडी गावाचे पूर्व – देशमुख आश्रम शाळा 2) आटपाडी गावाचे पश्चिम – निंबवडे रोड शासकीय विश्रामगृह 3) आटपाडी गावाचे दक्षिण – शेटफळे रोड शिवाजी मेटकरी घर 4) आटपाडी गावाचे उत्तर – दिघंची रोड ESSR पेट्रोल पंप 5) आटपाडी गावाचे नैऋत्य – भिवघाट रोड शिवप्रसाद पेट्रोल पंप.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close