ताज्या घडामोडी

शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे – शिराळा तालुक्यातील अंत्री येथील 1) सर्जेराव गणपती पाटील यांचे घर ते दिनकर गुंगा पाटील यांचे शेत पर्यंत रस्ता 2) दिनकर गुंगा पाटील यांचे शेत ते सर्जेराव रामा पाटील यांचे शेत पर्यंत शेत रस्ता 3) सर्जेराव रामा पाटील यांचे शेत ते मंगळनाथ दादू पाटील यांचे शेत पर्यंत शेत रस्ता 4) मंगळनाथ दादू पाटील यांचे शेत ते बाबूराव ज्ञानू पाटील यांचे शेत पर्यंत शेत रस्ता 5) बाबूराव ज्ञानू पाटील यांचे शेत ते आनंदा रघुनाथ केसरकर यांचे शेतपर्यंत शेत रस्ता 6) आनंदा रघुनाथ केसरकर यांचे शेत ते सर्जेराव गणपती पाटील यांचे शेत पर्यंत शेत रस्ता, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे – शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द येथे 1) अंत्री खुर्द तलाव ते उपवळे शिव 2) उपवळे शिव ते अंत्री बु. शिव 3) अंत्री बु. शिव ते मानकरवाडी शिव 4) मानकरवाडी शिव ते वाकुर्डे बु. व वाकुर्डे खुर्द शिव 5) वाकुर्डे बु. व वाकुर्डे खुर्द शिव ते अंत्री खुर्द तलाव.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close