महाराष्ट्रसांगली

सुरक्षितता हेही आमचं नवं ध्येय :’चितळे बंधू मिठाईवाले’

पुणे, सांगली : आम्ही ‘चितळे बंधू मिठाईवाले’ आजवर ग्राहकांच्या आनंदाला, समाधानाला परमोच्च स्थान देत आलो आहोत. गुणवत्ता राखणं, स्वच्छ आणि दर्जेदार व नवनवीन उत्पादनं सादर करणं ही आमची ध्येयं होती. पण आता सुरक्षितता हेही आमचं नवं ध्येय झालं आहे.

करोना विषाणू संसर्गाच्या काळात स्वच्छता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च स्थान देण्यासाठी आम्ही आमच्या कार्यपद्धतीमध्ये आणखी सुधारणा केली आहे. कर्मचाऱ्यांनी कारखान्यात येण्यापासून ते आमच्या दालनात उत्पादन येऊन आपण खरेदी करण्यापर्यंत प्रत्येक स्तरावर स्वच्छता आणि सुरक्षितता आधीपेक्षा जास्त ठेवली जात आहे. कारण सुरक्षित वातावरण सर्वांनाच हवं आहे. सर्वतोपरी काळजी घेऊन आपल्याला सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

आमचा हा प्रयत्न म्हणजे एक नवी सुरुवात आहे. त्याला आपल्याकडूनही साथ हवी आहे. आता पूर्वीसारखाच चवींचा आनंद साजरा करुया, नात्यांचा गोडवा जपूया…

तुमच्या आवडीची चितळे उत्पादनं आमच्या दालनात येऊन निर्धास्तपणे खरेदी करा किंवा ऑनलाइन ऑर्डर करा… कारण आपल्या सुरक्षेची काळजी आम्ही घेतोय.

#stayhome #staysafe #PuneFightsCorona #ChitaleBandhu #ChitaleGroup

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close