ताज्या घडामोडी

राज्यातील गोरगरीब जनता आणि स्थलांतरित मजूर यांच्या हितासाठी मी राज्यमंत्री असलेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, ते पुढील प्रमाणे…
१ – राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेत धान्य मिळत नसल्यास तसेच विना शिधापत्रिका धारकांना मे आणि जून महाराष्ट्र शासन मोफत तांदूळ देणार
२ – मे आणि जून साठी प्रत्येक व्यक्तीस प्रति महिना पाच किलोग्राम मोफत तांदूळ देणार
३ – हा लाभ राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेखाली शिधापत्रिकेसाठी अर्ज केलेल्या व्यक्ती, मजूर, रोजंदारी मजूर, विस्थापित मजूर यांना देण्यात येणार आहे
४ – आवश्यकता असलेल्या ठिकाणी जिल्हाधिकारी असे अन्नधान्य वितरण केंद्र निश्चित करून पात्र लाभार्थ्यांना केंद्रप्रमुख नियुक्त करून धान्य वितरित करणार
५ – सर्व पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळण्यासाठी सरपंच, नगरसेवक व दक्षता समिती मधील सदस्यांची मदत घेण्याचे निर्देश दिले आहेत
६ – धान्य वितरणासाठी ऑफलाईन पद्धत असेल. तथापि, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, शासन मान्य ओळखपत्र इत्यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे
७ – तांदळाचा दर्जा चांगला असेल याची दक्षता भारतीय अन्न महामंडळ व शासनाचे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे धान्याची तपासणी करूनच येणार आहेत.
#सदैव_आपल्यासोबत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close