ताज्या घडामोडी

आटपाडी शहर हद्दीत कंटेनमेंट आराखड्यास अंमलबजावणी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : आटपाडी तालुकयातील आटपाडी या शहरात पार्वती लॉज येथे एकाची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे – 1) आटपाडी गावाचे पूर्व – पार्वती लॉज ते हाके क्लासेसचे पाठीमागील रस्ता सिध्दनाथ सिटी स्कॉन सेंटर 2) आटपाडी गावाचे पश्चिम पार्वती लॉज ते वडार समाज स्मशानभूमी प्रकाशवाडी जि.प शाळा रस्ता, खंडोबा मंदिर 3) आटपाडी गावाचे दक्षिण – पार्वती लॉज ते आटपाडी शहरातील मुख्य रस्ता, शक्र ओढ्यावरील पुलाचे दक्षिण बाजूकडील मच्छिमार्केट 4) आटपाडी गावाचे उत्तर – पार्वती लॉज ते आटपाडी – दिघंची रोड, श्रीमंत बाबासाहेब देशमुख सह. बँक लि पर्यंत असा आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे – 1) आटपाडी गावचे पुर्व – देशमुख आश्रम शाळा 2) आटपाडी गावचे पश्चिम – निंबवडे रोड शासकीय विश्रामगृह 3) आटपाडी गावचे उत्तर – दिघंची रोड इस्सार पेट्रोल पंप 4) आटपाडी गावचे नैऋत्य – भिवघाट रोड शिवप्रसाद पेट्रोल पंप असा आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close