ताज्या घडामोडी

संग्राम पतसंस्थेच्या सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात ४७ लाख नफा

पलूस : संग्राम उद्योग समूहाचे संस्थापक,जि.प.मा.सभापती बापूसाहेब येसुगडे यांचा आदर्श व दूरदृष्टी समोर ठेऊन पारदर्शक कारभार व संस्थेचे ग्राहक सभासदांच्या सहकार्याने संस्थेची प्रगती सुरू आहे,असे चेअरमन निलेश येसुगडे यांनी सांगितले.

संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या प्रगतीची माहिती त्यांनी दिली.ते म्हणाले या आर्थिक वर्षांमध्ये अतिवृष्टी,महापूर व कोरोना विषाणूचे संकट लॉक डाऊनमुळे व्यवसायावरती मोठा प्रभाव पडला तरीही संस्थेच्या कर्जदारांनी वसुलीस सहकार्य केले असून वसुलीस चांगला प्रतिसाद दिलाआहे.संस्थेने आर्थिक वर्षांमध्ये ६७ कोटी रुपये चा व्यवसाय टप्पा पार केला आहे,मार्च अखेर संस्थेच्या ३७ कोटी ८७ लाख रुपये इतक्या ठेवी आहेत.संस्थेचा राखीव व इतर निधी ४ कोटी रुपये असून भागभांडवल ६० लाख रुपये,गुंतवणुक १० कोटी ६५ लाख रुपये व कर्जे वाटप २७ कोटी ४० लाख रुपये इतका केला आहे.संस्थेच्या सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात तीन नवीन शाखा अनुक्रमे शिराळा,आंधळी व कडेगाव शाखा सुरू केलेल्या आहेत पैकी शिराळा व आंधळी शाखेने मार्च २०२० अखेर प्रत्येकी १ कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण केलेला आहे.आर्थिक वर्षात संस्थेच्या व्यवसायात १५ कोटींची रुपयांची वाढ झालेली आहे,संस्थेस सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ आहे,स्थापनेपासून सभासदांना दरवर्षी ११% इतका लाभाऊंश दिला जातो.याही आर्थिक वर्षात सर्व सभासदांना लाभाऊंश देण्याचा मानस आहे तसेच येणाऱ्या आर्थिक वर्षात संस्थेच्या शाखा विटा,सांगली व भिलवडी याठिकाणी चालू करण्याचे नियोजित आहे अशी माहिती चेअरमन मा.निलेश(भैय्या)येसुगडे यांनी दिली यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन भरत गोंदिल, व्यवस्थापक आनंदराव जाधव,उपव्यवस्थापक वैभव पवार उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close