पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास व व्यक्तींच्या संचारास मनाई
सांगली : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक 3 व 4 मे रोजीच्या आदेशान्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास व व्यक्तींच्या संचारास विहीत कालावधीत मनाई करण्यात आलेली होती. या आदेशाचा कालावधी दिनांक 17 मे 2020 पर्यंत निर्गमित करण्यात आला होता. तथापि महाराष्ट्र शासनाने दिनांक 17 मे 2020 च्या आदेशान्वये लॉकडाऊन कालावधी दि. 31 मे 2020 पर्यंत वाढविल्याने सदर आदेशांचा कालावधीही दि. 31 मे 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून जारी केलेल्या आदेश क्र.गृह-1/कार्या-6/एमएजी-1/बं.आ./एसआर-261/2020 बंदी आदेश एस आर-15/2020 दि. 3 मे 2020 व क्र. गृह-1/कार्या-6/एमएजी-1/बं.आ./एसआर-16/2020 दि. 4 मे 2020 या आदेशांची अंमलबजावणी दि. 31 मे 2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सदरचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी कंटेनमेंट झोन व बफर झोन म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीत पूर्ण प्रभावाने लागू राहील.
सदरच्या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाव्दारे प्राधिकृत करण्यात आले आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.