विजय कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप
कवठेमहांकाळ (प्रतिनिधी) : आरेवाडी येथील व्यवसायिक विजय संभाजी कोळेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप केले. वाढदिवसाचे पैसे गरजूंच्या मदतीसाठी खर्च करण्याच्या या उपक्रमामुळे वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातल्याने अनेकांना रोजगारहिन होण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी १० वाजता श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयासमोर मान्यवरांच्या उपस्थितीत ९ कुटुंबियांना या कीटचे वाटप करून विजय कोळेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्यांना वाढदिवसाचा डामडौल न करता मदतीचा पायंडा पाडत विजय कोळेकर यांनी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
तसेच यशवंत कोळेकर यांनीही दोन कीटचे वाटप केले
याप्रसंगी सरपंच आबासाहेब साबळे, माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, श्रीराम ग्रुपचे अध्यक्ष अनिल कोळेकर, विजय कोळेकर , दाजी कोळेकर, इंजि.अनिल सोलंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, अपंग असलेले बापू भगवान कोळेकर यांना घरी जाऊन कीट प्रदान करण्यात आले.