
सॅनेटायझर वाटपाची मोहीम…
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मूलभूत स्वच्छतेची खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. त्याचसाठी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने सॅनेटायझरची निर्मिती केली आहे. कारखान्याचे संस्थापक आणि आपले प्रेरणास्थान डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रेरणेने, आदरणीय मोहनदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेतला आहे. पलूस कडेगांव मतदारसंघ व संपूर्ण सांगली जिल्हयात ही सॅनेटायझर वाटपाची मोहीम राबविताना मला अभिमान वाटतो आहे.
आज पलूस-कडेगाव मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता व दोन्ही तालुक्यातील प्रशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, तलाठी, एमएसइबी, सोसायटी, आरोग्य केंद्रे, बँक, पतसंस्था, पोस्ट, रेशन दुकान, पोलिस स्टेशन, पाटबंधारे ऑफिस या सर्व आस्थापनाकरिता सॅनीटायजर वाटप आज माझ्या हस्ते सुरु करण्यात आले.
या प्रसंगी श्री शांतारामबापू कदम, प्रांताधिकारी श्री गणेश मरकड, कडेगावच्या तहसीलदार सौ शैलजा पाटील , पलुसचे तहसीलदार श्री राजेंद्र पोळ उपस्थित होते.
…
आपण खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो!
…
#सदैव_आपल्यासोबत…