विचारपुष्प

जनहित में जारी..! विश्वजित कदम..लई भारी..!

कोरोनाचा कहर सुरू होऊन दोन महिने झाले.प्रत्येक राजकीय नेत्यांनी..डॉक्टरांनी-पोलिसांनी… सामाजिक संस्थानीं.. उद्योजकांनी..आणि प्रशासनाने आपापल्या परीने या संकटकाळात अभूतपूर्व योगदान दिले..देत आहेत.

यामध्ये एक शख्स असा आहे की ज्याला आपल्या संघटन कौशल्यावर आणि संघटनेवर प्रचंड विश्वास आहे..टीमवर्कने मोठ्या संकटांना आपण तोंड देऊ शकतो याची खात्री आहे.*मी पेक्षा आम्ही* हे करु शकतो याची जाणीव आहे.…आणि म्हणूनच मुंबईच्या अनिकेत म्हात्रेंपासून सांगलीच्या सौरभ पाटील यांच्यापर्यंत या कोरोनाच्या संकटात त्यांच्या नेतृत्वाखाली न भूतो काम करीत आहेत.न कद बडा.. न पद बडा… !मुसीबत मे जो साथ खडावो सबसे बडा… !*विश्वजित कदम..*महाआघाडी सरकारचा असा एक मंत्री जो या कोरोनाचा आपल्या सहकाऱ्यांसह डटकर मुकाबला करीत आहे.मुसीबत से निखरती है शकसियते यारो..जो चट्टानो से ना उलझे वो झरना किस काम का..बाळासाहेब..सत्ता नसताना पूर परिस्थितीत आपलं काम आम्ही पाहिलंय..बाळासाहेब.. आता तर तुम्ही मंत्री आहात..आणि साहेबांच्या माघारी तुम्ही ज्या जबाबदारीने काम करीत आहात..आम्ही अचंबित आहोत..बाळासाहेब..पलूस-कडेगावच्या प्रत्येक गावात जाऊन आपण ग्रामस्थांना कोरोनाबाबत जागरूक केलंत..या संकटात द्राक्षबागायदार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेत..जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू देणार नाही असे ठामपणे सांगितलेत…युवक काँग्रेस आणि NSUI च्या आपल्या टीमला बरोबर घेऊन गरज पडेल तिथं जेवणाची व्यवस्था केलीत..आपल्या अनेक टीमबरोबर व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधत ज्या त्या भागाच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवल्यात..आपल्या भारती हास्पिटलच्या माध्यमातून अस्मिताताईंच्या सहकार्याने रुग्णांना आधार दिलात..प्रशासनाबरोबर समन्वय साधत लागेल ती मदत देण्यासाठी पुढे झालात..या लढ्यात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क आणि सॅनिटाइझर दिलेत..पलूस-कडेगावच्या प्रत्येक घरात सॅनिटाइझर दिलेत…परप्रांतीयांना रेल्वे तिकिटांची व्यवस्था करुन त्यांना आपल्या गावी जाण्यास मदत केलीत..त्यांचीही जेवणाची व्यवस्था केलीत..महाआघाडी सरकारच्या वतीने गरजूंना अन्नधान्याचे वाटप व्हावे यासाठी पुढाकार घेतलात..*तुम्ही खबरदारी घ्या..मी जबाबदारी घेतो* असा विश्वास दिलात…..मान गये..साहेबांचा समाजकार्याचा वसा आणि वारसा आपण अविरत-अखंडपणे चालवत आहात..त्याच तत्परतेने..त्याच गतीने..🙏🙏बाळासाहेब..आमच्यावर संकट येऊच शकत नाही..आम्ही संकटांना सांगतो..साहेबांचा मुलगा आमच्या सोबत आहे..पलूस-कडेगाव आपल्यासाठी नेहमीच आदरणीय आहे आणि राहणार यात शंका नाही.पलूस-कडेगाव एक कुटुंब मानून आपण करीत असलेल्या कामाला आमचा सलाम..मानाचा मुजरा..*मदतीचा विश्वजित पॅटर्न..*#सदैव आपल्यासोबत..

-दीपक पाटील, भिलवडी

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close