ताज्या घडामोडी

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रूपये दंड : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : जिल्ह्यात कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने सदर विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणेवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कन्टेंन्मेट झोन वगळता इतर ठिकाणी लॉकडाउन मध्ये शिथिलता देण्यात येत असल्याने सार्वजनिक ठिकाणी कामसाठी नागरिक येत आहेत. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रूपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.या आदेशाची अंमलबजावणी पोलिस विभाग स्थानिक स्वराज्य संस्था व सबंधित विभाग प्रमुख यांना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close