गव्हाण येथे कोराना बाधित रूग्ण आढळून आलेल्या ठिकाण कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित
सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील गव्हाण या ग्रामपंचायत हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेले आहेत. या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार होवू नये यासाठी सदर भागातील व्यक्ती जनतेच्या हालचालींवर व प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाणे व बाहेरून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सदरचा भाग प्रतिबंधित करण्याच्या अनुषंगाने भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी तासगाव तालुक्यातील मौजे-गव्हाण येथे कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या ठिकाण कंटेनमेंट झोन व बफर झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
कंटेनमेंट झोन व अंतर पुढीलप्रमाणे – (1)गव्हाण-सांगली रस्ता,0.5 कि.मी,(2) सेवाआश्रम विद्यालय गव्हाण-सांगली रस्ता,0.5 कि.मी,(3) सेवाआश्रम विद्यालय गव्हाण-वज्रचौंडे रस्ता,0.5 कि.मी, (4) विठ्ठलनगर-हायस्कूल वज्रचौंडे,0.5 कि.मी (5) गव्हाण सावळज रोड-देशी दारू दुकाना समोरील रस्ता,0.5 कि.मी,(6) कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरापलीकडील बाजूस असणारा रस्ता 0.5 कि.मी
बफर झोन व अंतर पुढीलप्रमाणे – (1) मळणगाव रोड ,1.5 कि.मी, (2) गव्हाण -अंजणी रोड, 2 कि.मी, (3) गव्हाण-मळणगाव रोड,1.5 कि.मी, (4) गव्हाण- तासगाव,2 कि.मी, (5) गव्हाण- वज्रचौंडे,1 कि.मी, (6) विठ्ठलनगर-सांगली, 2 कि.मी, (7) हायस्कूल-वज्रचौंडे, 1.5 कि.मी, (8) गव्हाण-नागेवाडी,2 कि.मी, या भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी,अशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली आहे.