महाराष्ट्रसांगली

जनतेनं घरीचं रहावं ,सुरक्षित  रहावं : आमदार सुमनताई आर. आर.पाटील

सोनहिरा कारखाना व विश्वजीत कदम युथ फौंडेशनच्यावतीने कवठेमहांकाळ येथे सॅनिटायझरचे वाटप

कवठेमहांकाळ/प्रतिनिधी : चंद्रकांत खरात

कोरोना ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌लढ्यात आपण घरीच रहा आणि सुरक्षित रहा असा सल्ला वजा संदेश तासगाव कवठेमहांकाळच्या विद्यमान आमदार सुमनताई आर आर पाटील यांनी दिला. कवठेमहांकाळ येथील तहसिल कार्यालयात साॅनेटाईझर वाटपा प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत उपस्थित होते.
सॅनिटायझर वाटपाच्या प्रसंगी आमदार पाटील यांनी जनतेला घरीच रहा आणि सुरक्षित रहा असा सल्ला दिला.

या प्रसंगी जतचे आमदार विक्रमसिह‌ सावंत म्हणाले, की जनतेन कोरोना विषय घाबरून जाऊ नये. परंतु सावधानता बाळगाने काळाची गरज आहे.
मंञी विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनातील अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग यांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

यावेळी जत चे आमदार विक्रम ( दादा ) सावंत,आमदार सुमनताई पाटील, महाराष्ट्र प्रदेश चे काँग्रेस चे प्रतिनिधी माणिकराव भोसले,काँग्रेस तालुका अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष अविराजे शिंदे, काँग्रेस चे खजिनदार उदय शिंदे,मार्केट कमिटीचे संचालक अजित बनसोडे, वैभव गुरव, तहसीलदार गोरे साहेब, बी.डी.ओ.रविंद्र कणसे, नायब तहसीलदार भिसे ,नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष मोरे, नगरपंचायतीचे आरोग्य सभापती अय्याज मुल्ला ,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे शहर महेश पाटील आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close