महाराष्ट्रविचारपुष्प

माशी, गांधील माशी आणि मधमाशी..!

सत्ता हे मध आहे अशी कल्पना केली, तर या मधाच मूळ स्थान आहे फुल. मध फुलात तयार होत. पण फुलातील मध आपल्या चाखता येत नाही. त्यासाठी कसबी मध माशी ही फुलातील मध काढू शकते. आणि मग हे कण कण मध ती माशी पोवळ्यात नेऊन साठविते. तिथं मधाचा साठा तयार होतो. ती सत्ता. फुलं म्हणजे मतदार. हा मतदार कायम फुलच असतो. फ्लावर मधल फुल किंवा सिली मधल फुल. तो फ्लावर असला काय आणि सिली असला काय सारखच असत. मधाच पोवळ म्हणजे पक्ष. साध्या माशा म्हणजे कायम स्वरूपी कार्यकर्ते, यांनी फक्त घोंगावत राहायचं. घोषणा देत राहायचं. आपल्या जेवणाची सोय आपणच बघायची. पक्ष घोंगवायला बोलवेल तेंव्हा जाऊन घोंगवायच. यांना सत्तेच्या मधाच्या पोवळ्याच्या जवळपास सुद्धा फिरकायची परवानगी नसते. ज्या माशा पोवळ्यावर बसलेल्या असतात त्याना एक डंख मारण्याचा काटा असतो तो साध्या माशीला नसतो. या सत्तेच्या पोवळ्यावर बसून मध चाखू शकतात. या दंश करणाऱ्या माशात दोन प्रकार असतात. एक गांधील माशी आणि दुसरी मधाची माशी.
या पोवळ्याच्या मधोमध एक राणी माशी असते. ती या पोवळ्याची संपूर्ण मालकीण असते. मालकीण एकच असते. पण इतर कोणी मालकीण व्हायचा प्रयत्न केला तर जुनी राणी आणि नवीन होऊ पाहणारी नवी राणी यांच्यात युद्ध होते. जी जिंकते तिची पोवळ्या वर मालकी प्रस्थापित होऊन, हरणाऱ्या माशीच्या नशिबी वनवास येतो. तिला मधाच पोवळ सोडून परांगदा व्हावं लागतं. हेच प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेतृत्व पदाच्या भांडणातून होते आणि हरणाऱ्याच्या नशिबी राजकीय वनवास येतो.
आता गांधील माशी आणि मधमाशी या दोघी दंश करतात पण यांच्यात फरक असतो. गांधील माशी मध गोळा करू शकत नाही फक्त डंख मारते तर मधमाशी डंखही मारते आणि मधही गोळा करते. गांधील माशीची ही निष्क्रियता कोणाच्या तरी लक्षात येते आणि मग तिला मधाच्या पोवळ्या पासून लांब ठेवलं जात. त्यावर ही गांधील माशी अधिक पिसाळते आक्रमक होते आणि दिसेल त्याचा चावा घेत.
त्या गांधील माशी सारखी अवस्था खडसे साहेबांची झाली आहे आणि त्यानी दिसेल त्याला चावा घ्यायला सुरुवात केली आहे. त्यात चंद्रकांतदादा पाटील आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत. आता तर त्यांनी थेट गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला केला आहे.
खडसे साहेबांच्या वागण्यामुळे फुले म्हणजे मतदार नाराज झाली. त्यातून खडसेना फुलातील मध म्हणजे जनतेतील मत मिळणं कमी झाल होत. त्यांची मुलगी त्यांच्या मतदार संघात पराभूत झाली होती म्हणजे त्यांचा जनाधार ढासळला होता.
जनाधार ढासळायला ते स्वतः जबाबदार आहेत. ते दोनदा मंत्री झाले. त्यांच्याकडे 12/13 अत्यन्त महत्वाची खाती होती. तरी त्यांनी जनता आणि कार्यकर्त्यासाठी काही केलं नाही. सर्व घरी घेऊन गेले. आमदारकी मंत्रिपद स्वतःला, सून खासदार, बायको जिल्हा सहकारी बँकेच्या चैरमन, महानंदा दूध संघात चैरमन. मुलीला विधानसभेच तिकीट. म्हणून कार्यकर्ते उलटले, आणि मतदार लांब गेले. त्यामुळे एकनाथ खडसे साहेबांचे रूपांतर मध माशीतून गांधील माशीत झाले. म्हणून त्यांना पक्षाने बाजूला केले. यात दोष कोणाचा? गोपीचंद पडळकर यांचा तर अजिबात नाही.
तरी खडसे साहेब गोपीचंद वर घसरले. खडसे साहेबां पेक्षा गोपीचंद खूप लहान कार्यकर्ते आहेत. तरी त्यांनी गोपीचंद यांच्या वर हल्ला केला आहे. ते म्हणतात,
“गोपीचंदने पक्ष विरोधी काम केले. मोदींच्या सभावर बहिष्कार टाकायला सांगितला. बिरुबाची शपथ घालून भाजपला मत देवु नका सांगितलं. विधानसभा हारूनही विधान परिषद दिली.” का दिली? याच एका वाक्यात उत्तर देतो,
*दुभत्या गाईच्या लाथा गोड*
*दुभत्या गाईला पौष्टिकखाना आणि भाकड गाईला कसाबखाना. ही रीत आहे जगाची, ते काय असत ते पुढच्या लेखात सांगतो*
आता एवढंच सांगतो की, गोपीचंद नावाच्या वादळाला स्वपक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांकडून एवढा विरोध का? गरुड 🦅 बघितल्यावर सापांची🐍 जी अवस्था होते ती अवस्था गोपीचंद विधान परिषदेत येणार म्हटल्यावर, नाथाभाऊ खडसे, शशिकांत शिंदे आणि जयवंत पाटील यांची झाली, आजी माजी मंत्री असलेले हे तीन दिग्ज गोपीचंदला बघून टरकले हे आहे गोपीचंदच सामर्थ्य.
*सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यातून एकूण 9 आमदार परिषदेवर घेतले. ईतर 8 उमेदवार सामान्य लोकांना माहित सुध्दा पडले नाहीत कोण आहेत ते. सर्वांच्या मुखात एकच नाव. *गोपीचंद, गोपीचंद, गोपीचंद.*
*शत्रूची ही पळापळ बघून आता आमच्या लक्षात आलं की आमचा माणूस खरच खूप मोठा आहे राव*
एकनाथभाऊ तुम्ही गोपीनाथ मुंढेंच्या पंगतीतील जेष्ठ नेते आणि तुम्ही गोपीचंद सारख्या नव्या कार्यकर्त्यासी स्पर्धा करता तेंव्हा साक्षात द्रोणाचार्य कौरव पांडवाशी स्पर्धा करत आहेत असं आम्हाला वाटत. तेंव्हा आम्हाला कळत की, खरच आमचा गोपीचंदच खूप मोठा माणूस आहे.
नाथाभाऊ तुमच्या मुक्ताईनगर विधान सभेत 30 हजाराच्या वर धनगर मतदार आहेत. तुम्ही गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीवर जे काहूर उठवल ते बघून हा सर्व धनगर नाराज आहेत. मला रोज तिथून 10/15 फोन येतात आणि तुमच्या वागण्या बद्दल संताप व्यक्त करत आहेत. आता काय करायचं ते तुम्ही ठरावा.
– बापू हटकर

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close