
40 जणांनी केले रक्तदान, 16 वर्षे उपक्रम
भिलवडी : द आर्ट ऑफ लिव्हिंग शाखा भिलवडी यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अध्यात्मगुरु श्री.श्री.रविशंकर जी यांच्या ६४ व्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भिलवडी शाखेच्यावतीने सलग सोळा वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. आदर्श ब्लड बँक सांगली यांनी रक्तदानाचे संकलन केले़.रत्नत्रयकुंज निशिधी येथे सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोर पालन करून रक्तदान शिबिर झाले.
यावेळी 40 जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात दिवसरात्र लोकांचे संरक्षण करणारे सांगली पोलिस दलातील भिलवडी पोलिस ठाणे चे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग व श्री. पांगे या पोलिस अधिकाऱ्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले.
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून उपस्थित परिचारिकांचा सत्कार कवी सुभाष कवडे यांच्या हस्ते करण्यात आला.
संयोजन शशिकांत भागवत,सुबोध वाळवेकर,श्रीकांत जोशी,महादेव महिंद,अशोक जाधव,डॉ.भालचंद्र कुलकर्णी यांनी केले