उत्तरप्रदेशला 824 जण रेल्वेने रवाना : जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी घेतला निरोप
सांगली : लॉकडाऊनमुळे सांगलीमध्ये अडकलेल्या विविध कंपन्यांमध्ये काम करण्याऱ्या उत्तरप्रदेश मधील 824 जणांना मिरज येथून रात्री 10 वा घेवून निघणाऱ्या
रेल्वेला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट दिली. जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी ह्यावेळी या कामगारांची विचारपूस केली. महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाला धन्यवाद देत त्यांनी गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला. दूरचा प्रवास असल्याने प्रशासनाने या सर्वाना खाण्यासाठी टिकाऊ अन्नपदार्थ व पाण्याच्या बाटल्या देवून प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
सर्वाची वैद्यकीय तपासणी करून ते कोव्हिड सदृष्य आजारी नसल्याची तपासणी करून महसूल यंत्रणेने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत रेल्वे प्रशासनाने उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूरसाठी येथील 824 जणांना रवाना केले.
महाराष्ट्र शासनाचे आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणांचे आभार मानले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, मिरजेचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पोलीसउपधिक्षक संदिपसिंह गिल, तहसिलदार रणजीत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.