सांगली

वाळवेकर हॉस्पिटल, स्पंदन हॉस्पिटल यांच्यावतीने पोलिस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी

भिलवडी :भिलवडी तालुका पलूस येथे वाळवेकर हॉस्पिटल सांगली ,भिलवडी व स्पंदन हॉस्पिटल अॅण्ड क्रिटिकल केअर सेंटर आष्टा यांच्या संयुक्त विद्यमाने भिलवडी येथील पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची तसेच पत्रकार बांधवांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशांमध्ये लॉक डाऊन घोषित करण्यात आला. तसेच लॉक डाऊन दरम्यान देशभरात संचारबंदी लागू असल्याने, पोलिसांना २४ तास तटस्थपणे आपले कर्तव्य बजावावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावरती कामाचा ताण वाढत आहे. सदर बाबींचा त्यांच्या आरोग्यावरती कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी स्पंदन हॉस्पिटल अॅण्ड क्रिटिकल केअर सेंटर आष्टा, वाळवेकर हॉस्पिटल सांगली तसेच वाळवेकर हॉस्पिटल भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने भिलवडी तालुका पलुस येथे भिलवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास कोडग व उपनिरीक्षक विशाल जगताप यांच्यासह सुमारे 40 पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण, ब्लड प्रेशर,इ.सी.जी. तसेच शारीरिक तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ. सुमित कबाडे यांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी व तणावाच्या पाश्वभूमीवर स्वतःची कशी काळजी घ्यावी, त्यावरील उपाय योजना याविषयी संपूर्ण पोलिस स्टाफला मार्गदर्शन केले.

वाळवेकर हॉस्पिटलचे डॉ.रवींद्र वाळवेकर, डॉ.राजेंद्र वाळवेकर, व स्पंदन हॉस्पिटल चे डॉ.सुमित कबाडे , डॉ.सुनिल वाळवेकर, तसेच डॉ.नितीन परीट, डॉ.श्रेयश चोगुले, डॉ.रोहित मस्के,डॉ.प्रतीक पाटील, डॉ.अनवर नालबंद यांनी तपासणीचे काम पाहिले. दरम्यान, जि.प. सदस्य सुरेंद्र वाळवेकर व ज्येष्ठ पत्रकार महावीर (काका ) मद्वाण्णा यांनी ही भेट देवून माहिती घेतली.
वैद्यकीय तपासणी केल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे .आजपर्यंत इतका कामाचा त्रास होत आहे, त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून वैद्यकीय तपासणी करून घेतली. यामध्ये तपासणीमध्ये काही आढळल्यास त्यावरती डॉ कबाडे, वाळवेकर यांनी पोलिसांना औषध उपचार देत मार्गदर्शन केले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close