महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून श्रमिकांसाठी सलग तिसऱ्या दिवशी मोलाची मदत

कोल्हापूर : लॉकडाउनमुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अडकून असलेल्या श्रमिकांसाठी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी श्रमिक रेल्वे परराज्यात पाठवत आहोत. यावेळी, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून जेवणासोबतच, सुके खाद्य, पाण्याची बॉटल्स या श्रमिकांना देण्यात आल्या, अशी माहिती पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिली.
गेल्या तीन दिवसात मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यातील ५२०७ श्रमिकांना फूड पॅकेट (२ चपाती, राईस, आमटी, भाजी, लोणचे) आणि सुके खाद्य पदार्थ (चिरमुरे, फरसाण, २ बिस्कीट पुडे, २ पाण्याच्या बाटल्या) काँग्रेसतर्फे देण्यात आले, असेही पाटील यांनी सांगितले.
Share