भटक्या कुत्र्यांना अमानुष वागणूक; कवी बाबासाहेब कोकरे यांनी व्यक्त केला संताप

कवी बाबासाहेब कोकरे यांच्या घरासमोर एक लिंबाचा मोठा वृक्ष आहे. सावलीच्या विसाव्याला वयस्कर लोकसुद्धा बसतात; एखाद्याला दगड लागला तर जबाबदार कोण? सांगून सुद्धा काही नमुने ऐकत नाहीत. त्या लिंबाच्या झाडाखाली बसण्यासाठी दोन-तीन कुत्री त्या ठिकाणी येतात; कडक उन्हाचा बचाव करण्यासाठी मुके प्राणी झाडाखाली एका बाजूला बसतात. त्यापैकी एक कुत्रं जन्मापासूनच पायाने अधू आहे. येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला कसलाच त्या कुत्र्याचा उपद्रव नसतो; तरीसुद्धा काही लोकं दगड मारताना दिसतात. असे प्रकार अनेक ठिकाणी घडतात. याचा प्रत्यय वर्तमानातील बातम्या वाचून या अगोदर आलाच आहे. कधी-कधी मुक्या प्राण्यांचा जीवही जातो. त्यामुळे अमानुष वागणूक मुक्या प्राण्यांना कुणी सुद्धा देऊ नये. लॉक डाऊनच्या काळात त्यांचे अन्नपाण्याविना उपासमार होते. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने घराच्या अंगणात अन्न पाण्याची सोय करून मुक्या प्राण्यांची सेवा करावी. विनाकारण मुक्या प्राण्यांना दगड मारू नयेत. अशी अमानुष घटना पुन्हा दिसल्यास मुक्या प्राण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने आवाज उठविला पाहिजे असे कवी बाबासाहेब कोकरे यांनी सांगितले.