सांगली

अंकलखोप येथे वडिलांच्या वर्षश्राद्धासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम स्था.आ.व्य. समितीस दान

५१ हजार रुपयांचा धनादेश केला सरपंचांकडे सुपुर्द..
अंकलखोप : येथील उद्योजक राजेश चौगुले, व इस्लामपूर येथील प्रसिध्द धन्वंतरी डॉ. उमेश चौगुले यांनी आपल्या वडिलांच्या प्रथम वर्षश्राद्धासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम अंकलखोप ग्रामपंचायतीच्या स्थानिक अापत्ती व्यवस्थापन समितीस मदत म्हणून देवून, सामाजिक बांधिलकी जपत समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.

अंकलखोप ता. पलुस येथील उद्योजक राजेश चौगुले व इस्लामपुर येथील प्रसिध्द धन्वंतरी डॉ. उमेश चौगुले यांनी ८ मे २०२० रोजी आपले वडिल स्व. डॉ. बापुसो सखाराम चौगुले यांच्या प्रथम वर्षश्राद्धाचा कार्यक्रम लॉकडाऊनचे नियम व अटींचे पालन करीत, गर्दी टाळून,साध्या पद्धतीने कुटुंबीयांसोबत संपन्न केला.या वर्षश्राद्धासाठी येणारा संपूर्ण खर्च वाचवून, तो कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी ग्रामपंचायत अंकलखोपच्या आपत्ती व्यवस्थापन समितीला मदत करण्यासाठी सरपंच अनिल विभुते यांच्याकडे एकावन्न हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. स्व. डॉ. बापुसो सखाराम चौगुले यांना तीन मुले, महेश हे अभियंता असून ते मुंबई येथे कार्यरत आहेत. तर डॉ. उमेश चौगुले हे इस्लामपुर येथे व राजेश चौगुले हे मुंबई येथे आहेत. त्यांनी पाच हजार कुटूंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आजपर्यंत त्यांनी गावात विविध उपक्रम राबविले आहेत. २५०० वृक्षांची लागवड करून, स्व खर्चांने त्यांचे जतन केले आहे. त्यामुळे अंकलखोप परिसर हिरवाईने नटला आहे. त्यांनी दिलेल्या मदतीमुळे कोरोनामुळे गावात येणा-या लोकांच्या संस्थांत्मक क्वारंटाईन करावयांच्या लोकांसाठी व गावातील औषध फवारणीसाठी उपयोग होणार आहे.
चौगुले कुटूंबीयांनी ग्रामपंचायतीच्या आपत्ती व्यवस्थापन निधीस केलेली मदत ही खरंच उल्लेखनीय व कौतुकास्पद बाब आहे. असे सरपंच अनिल विभुते म्हणाले. या प्रसंगी डॉ. उमेश चौगुले, राजेश चौगुले, विकास सुर्यवंशी, भास्कर चौगुले, राजेंद्र कुंभार, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. आभार अशोक चौगुले यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close