महाराष्ट्रसांगली

कवठेमंहाकाळमध्ये वीजबील माप करण्याची लोकांची मागणी

कवठेमंहाकाळ : चंद्रकांत खरात

कोरोना या घातक विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून घरीच थांबून राहावे लगत आहे. लाॅकङाऊनमुळे सर्व काही ठप्प झाले आहेत. त्यामुळे घरगुती वीज वापर वाढला आहे .ह्या कालावधीतील वीजबिल माफ करावे , अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दि.२२ मार्च रोजी जनता कर्फू,त्यानंतर संचारबंदी व लॉकडाऊन सुरु झाले.त्यामुळे शासनाच्या आदेशाने ‘घरी रहा,सुरक्षित रहा’आदेशानुसार सर्वजण घरीच थांबले आहेत.या कालावधीत आपसुकच टेलिव्हिजन, मोबाईल,फॅन,कुलर,वातानुकूलित वस्तू व अन्य विजेच्या साधनांचा वापर वाढला आहे,शिवाय शेतकरी शेतीमध्ये व्यस्त आहेत. पर्यायाने वीज वापर जास्त वाढला आहे.शासनाने वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे,मात्र ह्या कालावधीत जनतेचे कोणतेही आर्थिक उत्पन्न नाही,आर्थिक उलाढाल नाही
व्यवसाय,उद्योग,व्यापार सर्व ठप्प आहेत.त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शासनाने या कालावधीतील संपुर्ण वीजबील माफ करावे,अशी मागणी शेतकरी,व्यापारी व सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close