खानापूर तालुक्यातील साळशिंगे गावच्या हद्दीत कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : सांगली जिल्हयातील खानापूर तालुक्यातील साळशिंगे गावच्या हद्दीत एकाची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे, तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे – 1) साळशिंगे गावातील वाडीचा मळ्याच्या पूर्वेकडे ओढ्यापर्यंत व देवनगर हद्दीपर्यंत 2) साळशिंगे गावातील वाडीचा मळ्याच्या पश्चिम दिशेस साळशिंगे देवनगर रोड व उत्तम पाटील यांचे पोल्ट्री फॉर्म पर्यंत 3) साळशिंगे गावातील वाडीचा मळ्याच्या दक्षिण दिशेस देवनगर गावाचे हद्द व ओहोळ पात्रापर्यंत ज्ञानदेव विठोबा जाधव यांचे घरापर्यंत 4) साळशिंगे गावातील वाडीच्या मळ्याच्या उत्तर दिशेस सांगोले हद्दीतून साळशिंगे हद्दीत येणारा व पुढे राधानी भेंडवडेकडे जाणारा टेंभू कालवा असा आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे – 1) साळशिंगे गावाचे पूर्वेस वेजेगाव सांगोले हद्दीतून येणारा टेंभू कालवा 2) साळशिंगे गावाचे पश्चिमेस राजधानी भेंडवडे हद्द व भाग्यनगर तलाव 3) साळशिंगे गावाचे दक्षिणेस भांबर्डे गावाची हद्द 4) साळशिंगे गावाचे उत्तरेस सागर भेंडवडे गावाचे हद्द असा आहे.