गोपीचंद पडळकर आमदार झाले, खासदार होता…होता वाचले

सांगली : राज्यसभेसाठी भाजमधून ३ नावाच्या शिपारशी महारष्ट्रामधून करायच्या होत्या. त्यासाठी अंतिम नावे हि महाराष्ट्रातून माजी खासदार उदयनराजे भोसले, खासदार रामदास आठवले आणि गोपीचंद पडळकर यांची नावे महाराष्ट्रातून पाठवली गेली होती. यामध्ये माजी खासदार उदयनराजे भोसले, खासदार रामदास आठवले यांची नावे केंद्रीय भाजपच्या टीमने मान्य केले. गोपीचंद पडळकर यांच्या विषयी नवा नियम लावून त्यांचे नाव केंद्रीय नेतृत्वाने शेवटच्या अंतिम टप्यात वगळले आणि वंजारी समाजाचे, संघाशी एकनिष्ठ असणारे गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराचा वारसा चालवणारे डॉ. भागवत कराड यांचे नाव केंद्रीय नेतृत्वाने नवीन नाव शेवटच्या क्षणाला पाठवले अन गोपीचंद पडळकर हे खासदार होता…होता वाचले.
महाराष्ट्र विधानपरिषदेची सध्या निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. हि निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपचे ४ उमेदवार बिनविरोध होणार आहेत. यामध्ये गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहितेपाटील, प्रवीण दटके, डॉ. अजित गोपछडे हे नवीन चार उमेदवार भाजपने दिले आहेत. यांच्या उमेदवारीवरून भाजपमधीलच जुन्या नेत्यांची नाराजगी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र भाजपमधील नेत्यांनी जुन्या नेत्यांची नावे विधानपरिषदेसाठी पाठवली होती. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जुन्या नेत्यांच्या नावाचा विचार न करता, नवीन चेहरा असणाऱ्या नेत्याची नावे महाराष्ट्र भाजपकडे आली असल्यामुळे महाराष्ट्र विधानपरिषद उमेदवाराची नावे निवड करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी वरिष्ठांचा आदेश पाळत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. याबाबत माजी मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा म्हणाले कि,
“विधानपरिषदेसाठी जुन्या नेत्याचीच नावे पाठवली होती. पण अंतिम निर्णय शेवटी वरिष्ठानी नवीन नावाचा केलेला आहे. तो सर्वाना मान्य करायलाच हवा.”
यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये सध्या नाराजगीचा सूर वाढलेला दिसून येतो. माजी मंत्री राम शिंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून आजी माजी आमदारांसह ८४ पदाधिकारांच्या शिपारशी पाठवल्या होत्या, तरीही राम शिंदेंना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे माजी मंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर सध्या संशयाचे वर्तुळ भाजपमधील जुन्या नेत्यांमध्ये निर्माण झालेले दिसते. असाच प्रकार राज्यसभेवेळी झालेला दिसून येतो.
राज्यसभेसाठी भाजमधून ३ नावाच्या शिपारशी महाराष्ट्रामधून करायच्या होत्या. त्यासाठी अंतिम नावे हि महाराष्ट्रातून माजी खासदार उदयनराजे भोसले, खासदार रामदास आठवले आणि गोपीचंद पडळकर यांची नावे महाराष्ट्रातून पाठवली गेली होती. यामध्ये माजी खासदार उदयनराजे भोसले, खासदार रामदास आठवले यांची नावे केंद्रीय भाजपच्या टीमने मान्य केले. गोपीचंद पडळकर यांच्या विषयी नवा नियम लावून त्यांचे नाव केंद्रीय नेतृत्वाने शेवटच्या अंतिम टप्यात वगळले आणि वंजारी समाजाचे संघाशी एकनिष्ठ असणारे गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराचा वारसा चालवणारे डॉ. भागवत कराड यांचे नाव केंद्रीय नेतृत्वाने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील भाजपला न विचारताच निवड केले. अन शेवटच्या क्षणाला गोपीचंद पडळकर हे खासदार होता…होता वाचले. यावेळी कधीही महाराष्ट्रातील जुन्या नेत्यांनी महाराष्ट्र भाजपने पाठवलेली नावे का मान्य केली नाहीत किंवा हि नवे नाव कसे आले याबाबत उलटसुलट चर्चा ऐकायला मिळाल्या नाहीत. मात्र विधानपरिषद निवडणुकांमध्येच सध्या उलट सुलट चर्चा सुरु आहेत. सध्या महाराष्ट्र भाजपमध्ये नाराजगीचे नाट्य जोरात सुरु आहे.
आनंदा टकले (सांगली)