ताज्या घडामोडीसांगली

भिलवडीत फिरत्या भाजीपाला,फळे विक्रीवर बंदी : स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीचा ठराव

  • त्या’ बेकरीला नोटीस देणार
  • दोनच दिवस आठवडयातील भाजीपाला व फळ विक्री
  • पुन्हा मामा-भाचेंची शाब्दीक चकमक, गावात चर्चा
  • गावच्या भल्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे गावामध्ये कोरोना विषयी दक्षता घेऊन गावात फिरून भाजीपाला,फळे विक्रीवर बंदी करण्यात यावी, असा ठराव स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

सांगली जिल्ह्यात थोडी शिथीलता मिळाली आहे, परंतु काही लोक गैरफायदा घेत सार्वजनिक ठिकाणी बाजारपेठेत अनावश्यक गर्दी करीत आहेत. याबाबत भिलवडी येथील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने दखल घेऊन अनेक महत्त्वाचे ठराव घेतले आहे. भिलवडी येथील मुख्य बाजारपेठ व गावातून फिरून विक्री करणाऱ्या भाजीपाला व फळ विक्री व्यावसायिकांनी आठवड्यातील दोन दिवस सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत विक्री करणे, परजिल्हा व परराज्यातून आलेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना हायस्कूल शाळेमध्ये कॉरन्टाईन केले जाईल, गावातील व्यापाऱ्यांनी ग्राहकांसाठी आपल्या दुकानाबाहेर सॅनिट्रायझर, साबण व पाण्याची सोय करावी, बेकरी समोर बेकायदेशीर देशी दारू बाळगणार्‍या ‘त्या’ बेकरीला आठ दिवस बंद ठेवण्याची नोटीस देणे, प्रत्येक वर्गात स्वयंसेवक निवडणे यासह आदी ठराव स्थानिक आपत्ती व्यवस्थापण समितीने घेतले.

भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना कोरोनाविषयी योग्य मार्गदर्शन केले.

भिलवडीचे सरपंच विजयकुमार चोपडे, जि.प. सदस्य सुरेंद्र वाळवेकर, ग्रामसेवक आर.डी. पाटील, सर्कल अशोक लोहार,तलाठी गौस महंमद लांडगे, चितळे उद्योग समुहाचे उद्योजक गिरीष चितळे, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, मोहन तावदर,दक्षिण भाग सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब मोहिते, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील, आरोग्य सेवक अमोल गुंडवाडे, पञकार आदी उपस्थित होते.

दरम्यान, सरपंच विजयकुमार चोपडे आणि जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर या मामा -भाचेंची काँरंटाईन लोकांना हायस्कूल शाळेत ठेवण्यावरून थोडी चकमक झाली. थोडी तात्विक गोष्टी होणारच परंतु, लोकांनी याचा गैरसमज करून चर्चा केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close