ताज्या घडामोडी

ध्यानचंद जीवन गौरव, राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य पुरस्कार – 2019 साठी आवाहन

26 मे पर्यंत अर्ज सादर करावे

सांगली : भारत सरकारच्या युवा व क्रिडा मंत्रालयामार्फत 2019-20 या वर्षाकरिता देण्यात येणारा ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांसाठी दिनांक 26 मे 2020 रोजी पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज क्रीडा संचालनालयाकडे सादर करण्यात यावे असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे.
सदरच्या पुरस्काराचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे दिनांक 03 जून 2020 पर्यंत सादर करण्यात येणार आहेत. यासाठी दिनांक 26 मे 2020 रोजी पर्यंत क्रिडा संचालनायाकडे अर्ज सादर करावेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पुरस्काराची नियमावली www.yas.nic.in या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावी असेही त्यांनी कळविले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close