ताज्या घडामोडी

सांगली जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या 23 हजार 300 हून अधिक, जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या 5 हजार 800 हून अधिक

सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभर लॉकडाऊन जारी आहे. लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील अनेक व्यक्ती राज्याबाहेर व राज्यातील अन्य जिल्ह्यात अडकून पडल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातही अन्य जिल्ह्यातील व राज्याबाहेरील व्यक्ती अडकून पडल्या आहेत. या व्यक्तींना त्यांच्या स्वगृही जाता यावे यासाठी शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानूसार दिनांक 10 मे पर्यंत सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर व अन्य जिल्ह्यात 23 हजार 349 व्यक्ती जिल्ह्याबाहेर गेले असून सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून 5 हजार 879 व्यक्ती जिल्ह्यात आले आहेत. अशा येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या 29 हजार 228 इतकी आहे. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली आहे.

यामध्ये सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या 9 हजार 619 व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या 13 हजार 730 व्यक्तींचा आहेत. सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून आलेल्या 2 हजार 146 तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या 3 हजार 733 व्यक्तींचा समावेश आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close