कोरोना तू माणसाला माणसात आणलंस

कोरोना तू माणसाला माणसात आणलंस
पैसे कमवण्यासाठी गेलेल्या पाखरांना तु आई वडीलांच्या मायेच्या पंखाखालीआणलंस
खरंच कोरोना तू माणसाला माणसात आणलंस
गांधीजींनी सांगितलं खेड्याकडे चला
हा संदेश पूर्वी आम्हाला चुकीचा वाटला
अनं आता तू आल्यानंतर जीव वाचवण्यासाठी लोक खेड्याकडे पळू लागले.
खरंच कोरोना तू माणसाला माणसात आणलंस
विषारी जातीयवादाला तु बाहेरच ठेवलंस
धर्म-जात न बघता माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रवृत्त केलंस
खरंच कोरोना तू माणसाला माणसात आणलंस
जीवन जगत असताना
पैशासाठी पायपीट करणाऱ्यांना जिवंत राहणं
हे पैशापेक्षा अनमोल वाटू लागलं.
खरंच कोरोना तु माणसाला माणसात आणलंस
गरीब-श्रीमंत असा भेद न करता तू सर्वांना तुझ्या संपर्कात आणलंस
प्रत्येक माणसाला जीवाच्या भितीने तू घरात बसायला लावलंस
खरंच कोरोना तू माणसाला माणसात आणलंस
———————————————–
-कवी अतुल जगदीश माळी, पोलिस नाईक
सांगली पोलिस भिलवडी पोलिस ठाणे.
मो.नं.7798202877
—————————————————