महाराष्ट्रसांगली

कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.संतोष मोरे यांची उत्कृष्ट कामगिरी

कवठेमहांकाळ : चंद्रकांत खरात

कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्यावतीने Covid 19 च्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या उपाययोजना राबवत आले आहेत. यामध्ये अनेक प्रकारची खबरदारी घेत कवठेमहांकाळचे नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ.संतोष मोरे यांची उत्कृष्ट कामगिरी आहे.

कवठेमहांकाळमध्ये नगरपंचायतीने Covid 19 च्या अनुषंगाने केलेली कामे पुढील प्रमाणे :

* संपूर्ण शहर, शहरामधील सरकारी कार्यालये, वर्दळीची ठिकाणे येथे जंतुनाशक औषधाची फवारणी केली.
* स्वत: मुख्याधिकारी हे MD डॉक्टर असल्याने स्वच्छता विषयाकड़े आणि स्वच्छ्ता कर्मचारी यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देतात.
* अत्यावश्यक सेवा देणाऱ्या तसेच जीवनोपयोगी वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या आस्थापनांना केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हाधिकारी, सांगली यांच्या वेळोवेळी दिल्या गेलेल्या निर्देशानुसार नियंत्रण ठेवले आहे.
* तालुकास्तरीय आपत्ती नियंत्रण समिती (. तहसीलदार गोरे साहेब , मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे , पोलिस निरीक्षक कोळी , BDO रविन्द्र कणसे आणि तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ. डी. पाटिल ) यांची रोज आढावा बैठक होते. या समन्वयातूनच उत्तम प्रशासन कवठेमहांकाळ शहरात दिसून येत आहे.
* शहरात नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी, पोलिस यंत्रणा, तहसील कार्यालय आणि आरोग्य यंत्रणा यांच्या प्रयत्नामुळे आणि नागरिकांनी व्यापारी संघटना यांनी केलेल्या सहकार्यामुळे कोरोना या वैश्विक महामारीशी लढण्यात यश येत आहे.
* मुख्याधिकारी हे त्यांच्या टीम सोबत रोज शहरामधे फिरुन सर्व परिस्थितिची पाहणी करतात. दिलेल्या नियमाचे जर कुठे उल्लंघन होत असेन तेथे दंडात्मक कारवाई करत असल्यामुळे सर्व काही नियंत्रणामधे असल्याचे चित्र पाहायला मिळते.
*पोलिस विभागासोबत रक्तदान शिबिर आयोजित केले. गरजू व मजूर वर्गातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीतून केले.
* दानशूर व्यक्ती तसेच संस्थांनी पुढे येऊन गरजूंना मदत करावी, यासाठी मुख्याधिकारी यानी 5000 रू.चे किट स्वखर्चाने देऊन एक संवेदनशील अधिकारी असल्याचा परिचय दिला.
* नागरिकांनी दिलेल्या प्रतिसदाबद्दल मुख्याधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले. पुढे या परिस्थितीला मात करण्यासाठी त्यांच्या सहकार्याची ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
* मुख्याधिकारी यांनी त्यांना तहसीलदार गोरे आणि पोलिस निरीक्षक कोळी यांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचेही नमूद केले आहे.
* कवठेमहांकाळ शहरातील नागरिकांनी स्वत:ची आणि आपल्या कुटूंबाची काळजी घेऊन पर्यायाने देशाला या भयानक परिस्थितितून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याचे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.
आपण सर्वजण मिळून कोरोना विरुद्ध चे युद्ध नक्की जिंकुया, असा संदेशही मोरे यांनी दिला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close