गरिबांचे कैवारी डॉ. पतंगराव कदम आणि भारती विद्यापीठ

भारती विद्यापीठ ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
भारत हा खेड्यांचा देश आहे, खेड्यातील प्रगतीवरच भारताचे भवितव्य अवलंबून आहे.
गतीमान शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचा मनात ध्येय ठेवून एका गरीब कुटुंबात जन्म घेवून वाडवडील किंवा घराण्याचा कोणताही आधार नसताना वयाच्या १९ व्या वर्षी भारती विद्यापीठाची १० में १९६४ साली पुणे येथे डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांनी स्थापना केली.
आज भारती विद्यापीठाच्या १८० हून अधिक शाखा उपशाखा आहेत, पूर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च शिक्षण, पदव्युत्तर तसेच वैद्यकीय अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम शिकविणारी शाळा कॉलेजस आहेत. दोन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून सुमारे तीस हजारहून कर्मचारी नोकरीस आहेत.
भारती विद्यापीठ दर्जेदार शिक्षण देणारी देशातील एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते.
भारती विद्यापीठाच्या शाखा दिल्ली, मुंबई, पुणे, दुबई यासारख्या मोठ्या शहरापासून दुर्गम भागातील छोट्या गावापर्यंत विस्तारीत आहेत.
अमेरीका आणि इतरही राष्ट्रांत भारती विद्यापीठाची केंद्रे सुरू आहेत.जगातील एकमेव अशी संस्था आहे झोपडपट्टी वसाहती मध्ये राहणाऱ्या कुटुंबातील गरीबांच्या मुलांना शिक्षणाची दालने उपलब्ध करून दिली आहेत.
भारती विद्यापीठाने ग्रामीण विकासातही मोलाचे योगदान देऊन लोकशिक्षणाचे काम केले आहे.प्रतिवर्षी काही कोटी रुपयांची गरजू विद्यार्थ्यांची फी माफ केली जाते.
डॉ. पतंगरावजी कदमसाहेबांनी भारती विद्यापीठ काही दशकानंतर अभिमत विद्यापीठाच्या रुपानं प्रत्यक्षात आणली.
डॉ. पतंगरावजी कदमसाहेब भारती युनिव्हर्सिटीचे कुलगुरु होते. स्थापनेनंतरच्या ५५ वर्षात अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि संगणक विज्ञान, संशोधक या विषयांची महाविद्यालये स्थापन केली.
डॉ. पतंगरावजी कदमसाहेब एक अजब रसायन होते. त्यांना विरोध करणाऱ्यांनाही त्यांनी शिक्षण संस्था उभ्या करण्यासाठी मदत केली.
महाविद्यालयाच्या गुणवत्तेचे मुल्यांकन करणाऱ्या नॅशनल असेसमेंट अँन्ड अँक्रिडिटेशन कौन्सिल या शिखर परिषदेने भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाला ए, प्लस श्रेणी प्रदान करून विश्वविद्यालयाचा शैक्षणिक व संशोधन कार्याचा गौरव केला होता.
डॉ. शिवाजीराव कदम सर कुलगुरू यांच्या कुशल नेतृत्वाने भारती विद्यापीठाला नॅकने लागोपाठ दोन वेळा “अ” दर्जा देऊन भारत सरकारने “अ” दर्जाचे विद्यापीठ अशी मान्यता देऊन गौरविण्यात आले..
भारत सरकारने १९९६ भारती विद्यापीठाच्या कॉलेजांची उंच्च शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन भारती विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. २६ कॉलेज आणि तीन संशोधन संस्था अंतर्गत असलेले भारती विद्यापीठ विश्वविद्यालय स्थापन झाले.
भारती विद्यापीठ शासकीय अनुदानाशिवाय भारती विद्यापीठ नियमित मानधन व प्रासंगिक आर्थिक साध्य करते. याची माहिती फारच लोकांना आहे भारती विद्यापीठाच्या उंच्च शिक्षणाच्या शाखा बहुतांशी विनाअनुदानित आहेत.
शासकीय अनुदानाशिवाय शिक्षण संस्था चालविने एक दिव्यच असते. अनेक प्रकारचे निर्बंध आणि अडचणी यातून मार्ग काढावा लागतो यामध्येही यश मिळवून भारती विद्यापीठ ५६ वा वर्धापनदिन साजरा करित आहे.
भारती विद्यापीठाच्या एकापेक्षा एक सरस इमारती आणि देखना परिसर आहे.
भारती विद्यापीठाची गेल्या ५५ वर्षातील वेगवान खडतर यशस्वी वाटचाल शून्यातून प्रारंभ करून जागतिक पातळीवर आपली कीर्ती संपादन केली आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हा उच्च शिक्षणाचा पाया आहे. तो मजबूत असला पाहिजे. ग्रंथालयात आणि प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वेळ थांबले पाहिजे. औद्योगिक क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन त्याचा अंतर्भाव शिक्षणात झाला पाहिजे.कौशल्ये असतील तरच विद्यार्थ्यांना भविष्यात संधी उपलब्ध होतील.यासाठी भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी सतत प्रयत्नशील आहे.
भारती विद्यापीठाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली. असे चित्र अन्य स्वायत्त विद्यापीठात दिसत नाही.
भारती विद्यापीठाचा एखादा कार्यक्रम असला की डोळ्यासमोर दिसतात ते फक्त डॉ. पतंगरावजी कदमसाहेब
डॉ पतंगरावजी साहेब आजही आपल्यात असल्याचा सतत भास होतोय.
भारती विद्यापीठ ज्ञानगंगा माणुसकीचे, सरस्वतीचे मंदीर आहे.
भारती विद्यापीठाच्या मंदीरात एका हाताने केलेले दान दुसर्या हाताला कळत नाही.
भारती विद्यापीठ परिवाराने पलूस-कडेगाव मतदारसंघाचे पालकत्व स्विकारले आहे.
लोकसमाजाच्या बाजूने विचार करणारे कदम कुटुंबीय सामाजिक बांधिलकीचे अधिष्ठान आहेत.
आज सुद्धा वहिनीसाहेब यांच्या चेहऱ्यावर साहेब नसल्याचे दु:ख जाणवत आहे.
डॉ पतंगरावजी कदमसाहेब यांनी संस्था उभ्या करताना राञीचा दिवस केला.
वहिनीसाहेब यांनी डॉ पतंगरावजी कदमसाहेब यांना समर्थ साथ दिली होती.
वहिनीसाहेबांनी आपले दु:ख सावरून आपला मुलगा विश्वजीत आणि आपल्या कुठुंबाला,भारती विद्यापीठाला आपल्या मायेच्या पदराखाली घेतले आहे.
डॉ. पतंगरावजी कदमसाहेबांनी भारती विद्यापीठाला पोटच्या मुलासारखे वाढवले,या इवल्याश्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर केले.
डॉ. पतंगरावजी कदमसाहेब सतत म्हणायचे मला काही पण बोला पण माझ्या भारती विद्यापीठाला कोणी नावं ठेवलं तर मला कदापीही खपनार नाही आणि खपवून घेणार नाही.
आज या वटवृक्षाच्या सावलीत लाखोंहजारोंच्या संख्येने मुल-मुली शिक्षण घेत आहेत.
डॉ पतंगरावजी साहेब तुम्ही इतके दिले आम्हा हे कधी सरावे तुम्हा दाता म्हणावे कि विधाता म्हणावे, पिता, दाता विधाता म्हणून सदैव आमच्या स्मरणी असावे, आपल्या आशिर्वादाच बळ भारती विद्यापीठावर आम्हावर सतत रहावे.
आज शिक्षणक्षेत्र अनेक स्थित्यंतस्तरातून जात आहे या स्पर्धेच्या युगात शिक्षण क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत त्याचा सामना करण्यासाठी सतत अध्यावनाची गरज आहे, मानवतेची मूल्ये शिक्षणातून मुलांच्या मनात रूजली पाहिजेत यासाठी डॉ विश्वजीत कदमसाहेब, श्रीमती विजयमाला (वहिनीसाहेब), डॉ. शिवाजीराव कदम सर आणि इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग काम करीत आहेत.
भारती विद्यापीठाच्या “५६” व्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
!!- अरूण सावंत