ताज्या घडामोडी

निमज येथे वायरमनचा खून,एकास अटक: एक फरार

कवठेमंकाळ : चंद्रकांत खरात

निमज तालुका कवठेमहांकाळ येथे विजेच्या तारेवर टाकलेले कपडे काढत असताना बाप-लेकांनी जोरदार मारहाण केल्याने ढालगाव च्या वीज उपकेंद्रातील कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी रमेश आनंदा दगडे (वय 41) राहणार कदमवाडी ढालगाव यांचा मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्या नितिन गोपाळआमुणे(वय 28 ) व गोपाळ उर्फ गोपीनाथ आमुणे राहणार निमज त्यांच्यावर कवठेमंकाळ पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी मयत रमेश दगडे व दशरथ केंगार हे दोघे वायरमन निमज गावांमध्ये कार्यरत आहेत. दि. 28 ला निमज येथील लक्ष्मण पाटील यांच्या डाळिंब बागेत होईल ट्रांसफार्मर जळाला होता .तरीपण आसपासच्या खांबावर काही ग्राहक मोठ्या प्रमाणावर वीज चोरून वापरत असलेले दुसऱ्या ट्रांसफार्मरवर लोड वाढला होता ,हे बघण्यासाठी उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता विवेक वायफळे यांनी दगडे व केंगार या कामगारांना भागात पाठवले होते, सकाळी नऊ वाजता दोघेजण ठिकाण्यावर पोहोचले. त्यावेळी दगडे यांना बऱ्याच ठिकाणी तारेवर टाकलेले आकडे दिसून आल्यानंतर त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला असता, तेथे उपस्थित गोपाळ आमुणे यांनी प्रथम दगडे यांना मारहाण केली. नंतर मुलगा नितीन आमुणे यांनी जोरदार दगडाने व हातापाया ने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. गंभीर जखमी रमेश दगडे यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .उपचार सुरू असताना तारीख 1 रात्री नऊ वाजता रमेश दगडे यांचे निधन झाले आहे. मयत रमेश हा अत्यंत गरीब असून घरच्यांचा व स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी महावितरण मध्ये तुटपुंज्या वेतनावर काम करत होता. रमेश दगडे यांच्या मृत्यूनंतर कवठेमहांकाळ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नितीन आमुणे याला तारीख 2 सकाळी अटक करण्यात आली आहे.तर गोपीनाथ आमुणे फरारी आहेत.दरम्यान. निमज मध्ये वायरमन ला झालेल्या मारहाणीत रमेश दगडे यांचा मृत्यू झाल्यानंतर निमज मध्ये कोणताही कर्मचारी कामास जाणार नसल्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close