ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसांगली

कर्तबगार पोलिस अधिकारी आप्पासाहेब कोळी

कवठेमंहाकाळ : चंद्रकांत खरात

कवठेमंहाकाळ तालुक्याची संवेदनशील तालुक्याकडे वाटचाल करणाऱ्या कवठेमंहाकाळ तालुक्याचे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या कार्यकाळात सामाजिक बांधिलकी अ वैद्य धंद्यावर वचक, गुन्हेगारांवर वचक,योग्य प्रशासन व जनतेच्या प्रश्नांना हाताळण्याची हातोटी यातून कर्तबगार पोलिस अधिकारी म्हणून जनतेत त्यांची चर्चा होत आहे.

कवठेमंहाकाळ तालुक्यातील पोलिस विभागाचा कार्यभार घेतल्यापासून योग्य नियोजनाने जनतेच्या प्रश्नांचा डोंगराएवढ्या पसार यातून उपलब्ध पोलिस कर्मचाऱ्यांच्या बळावर पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी कोरोना सारख्या महामारीतून तालुक्यात शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केले आहे. जनतेच्या सहकार्याने कोणताही अनुचित प्रकार घडू न देता केल्याने जनतेच्या कौतुकास पात्र कवठेमंकाळ पोलिस प्रशासन ठरत आहे. तालुक्यातील लॉक डाऊन सर्व नियमांचे पालन केल्याने तालुक्यात जनतेच्या मदतीने कोरनाला हरवल्याचे चित्र दिसून येते .सामाजिक बांधिलकीची जाण असणारे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी कोरोना काळात कवठेमहांकाळ पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्या प्रती उत्साह जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यात गुन्हेगारावर जबर वचक बसवताना 24 तासात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. ढालगाव पाठोपाठ नागज खून प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ जेरबंद करून गुन्हेगारांना पोलिस खाक्या दाखवला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले,की जनतेच्या पाठिंब्यावर सध्या तरी तालुक्यात कोरोना चा मुकाबला यशस्वीपणे केला आहे.जनतेने घरी राहून काळजी घ्यावी. पोलिस प्रशासन जनतेसाठी सदैव हजर असेल. पोलिस तुमच्यासाठी असून त्यांना सहकार्य करा. जागृत रहा, असे आवाहनही त्यांनी केले.

सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कोरोनाविषयी जोमाने जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close