कोल्हापूरमधून चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाची सुरवात

कोल्हापूर : कलानगरी असलेल्या कोल्हापूरमधूनच चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणाची सुरवात झाली. आज या क्षेत्रामध्ये कोल्हापुरातील अनेक नावाजलेले अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते, प्रोडक्शन सांभाळणारे अनेक तज्ज्ञ कार्यरत आहेत, असे पालकमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर खाजगी वाहिन्यांवरील मालिकांचे चित्रीकरण पूर्णतः बंद आहे. याचधर्तीवर, चित्रीकरणाची परंपरा असलेल्या कोल्हापूरमध्ये या मालिकांचे चित्रीकरण सुरु कारण्याबात आज कोल्हापुरातील या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकारात्मक चर्चा केली.
तसेच, कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा मराठी व हिंदी चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सुरु करण्यासंदर्भात दीर्घकालीन व ठोस योजना करण्याबाबत आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिवाय, यामुळे कोल्हापुरातील पर्यटन वाढीसही भविष्यामध्ये खूप मदत होणार आहे.
यावेळी, दिग्दर्शक अजय कुरणे, अभिनेता आनंद काळे, रवी गावडे, सुनील भोसले, शशांक पवार, स्वप्नील राजशेखर, मयूर रानडे, देवेंद्र चौगले, अश्विन सावनूर, संग्राम पाटील, मिलिंद अष्टेकर, विकास पाटील, अमर मोरे यांनी आपल्या मौलिक सूचना मांडल्या.