ताज्या घडामोडी

लॉकडाऊन काळात सांगलीत मद्यविक्री सकाळी 10 ते सायं. 6 पर्यंतच : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने सकाळी 10 ते सायं. 6 या वेळेतच सुरू राहतील, असे निर्देश मा. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिले.
मद्याचे घाऊक आणि ठोक विक्रेते यांच्याबाबत- ग्रामीण भागातील सर्व घाऊक विक्रेते यांचे व्यवहार चालू करण्यात येतील. शहरी भागातील कोणत्याही कंन्टेंन्मेंट झेानमध्ये वगळून इतर क्षेत्रातील घाऊक मद्य विक्रेत्यंचे व्यवहार चालू करण्यात येतील. तथपि सायंकाळी 5.00 नतंर व्यवहार सुरू ठेवता येणार नाही. अनुज्ञप्ती धारकांनी सर्व कामगार व गा्रहकांची थर्मल स्कॅनिंग करावी ज्या कामगारांस/ ग्राहकास सर्दी, खोकला व ताप या सारखी लक्षणे अशा व्यक्तींना अनुज्ञप्तीमध्ये प्रवेश देऊ नये. घाऊक विक्रेत्यांनी 50 टक्के मनुष्यबळावर काम करावे व सोशल डीस्टसिंग पाळावे.
किरकोळ मद्यविक्री दुकाने सुरू करण्यास शासनाने काही अटींवर अनुमती दिली असून यामध्ये फक्त सीलबंद मद्यविक्री करण्यास परवानगी राहील. ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू करता येतील. तर शहरी भागात महानगरपालिका व नगरपरिषद हद्दीमधील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने चालु करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील उक्त अनुज्ञप्ती सुरू करता येतील.
यामध्ये प्रामुख्याने 1) सीलबंद मद्य विक्री करणाऱ्या दुकानांसमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नयेत व दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फूट अंतर असणे अनिवार्य राहील. त्याकरिता दुकानासमोर प्रत्येक सहा फूटांवर वर्तुळ आखून घ्यावीत. 2) संबंधित अनुज्ञप्तीधारकाने सर्व नोकरांची/ ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावे व ज्या नोकरास, ग्राहकास सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत अशा व्यक्तींना दुकानात प्रवेश देवू नये. 3) दुकान सभोवतालचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतूकीकरण करणे आवश्यक राहील. दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांना पाळणे आवश्यक राहील. 4) भारत सरकार गृह मंत्रालय आदेश क्र.40-3/2020-डीएम-1(अे),दिनांक 01.05.2020 मधील परिशिष्ट -1 मधील कामाच्या ठिकाणी पाळण्याची मार्गदर्शक तत्वे किरकोळ विक्रेत्यांना पाळणे आवश्यक राहील. 5) किरकोळ मद्यविक्री दुकानांमध्ये लॉकडाऊनबाबतची मार्गदर्शक तत्वे पाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्याची जबाबदारी संबंधित अनुज्ञप्तीधारकाची असेल. 6) वर नमुद किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सीलबंद मद्यविक्रीसाठी सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत कार्यरत राहतील. 7) मुंबई विदेशी मद्य नियम, 1953 च्या नियम 70 (डी) अन्वये विहीत केलेली मद्य बाळगणे/ खरेदी करणे याच्या क्षमतेचा भंग होणार नाही याची संबंधित मद्यविक्रेत्याने आवश्यक काळजी घ्यावी. 8) कोणत्याही परिस्थितीत उघडलेल्या मद्य विक्रीच्या आस्थापनांमध्ये मद्यप्राशन होणार नाही याची दक्षता घ्यावी व अशी बाब आढळल्यास कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात यावी. 9) अशा कोणत्याही दुकानाने या मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास त्यांचे दुकान बंद करून त्यांच्याविरूध्द कारवाई केली जाईल. 10) प्रत्येक सीलबंद किरकोळ मद्यविक्री करणाऱ्या दुकानाच्या प्रवेशव्दारावर दर्शनी भागात पुढीलप्रमाणे फलक लावणे आवश्यक आहे. यामध्ये दुकानाच्या कामकाजाच्या सुधारित वेळा, एकावेळी दुकानासमोर पाचपेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत, सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर अनिवार्य, ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल, ज्या ग्राहकास सर्दी, खोकला व तापासारखी लक्षणे आहेत त्यांनी दुकानात येवू नये. दुकानात मद्य प्राशन करता येणार नाही, परिसरात थुंकण्यास सक्त मनाई आहे आणि दुकानदाराकडून व ग्राहकाकडून नियमभंग झाल्यास त्यांच्याविरूध्द कायद्यान्वये कारवाई केली जाईल.
सर्व व अनुज्ञप्ती धारकांना सूचित करण्यात आले आहे की कोणतीही खाद्यगृह मद्यविक्री अनुज्ञप्ती अथवा केवळ बसून पिण्याची सोय असलेली आस्थापना मधून मध्ये विक्री करता येणार नाही. दुकानदारांनी अधिकृत नोकर नामधारक यांना त्यांच्या घरापासून दुकानापर्यंत येण्यावर जाण्याकरिता संबंधित प्राधिकरणाकडून प्रवास प्राप्त प्रवास पास प्राप्त करून घेण्याची जबाबदारी संबंधित दुकानदारांची राहील. मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 अन्वये तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हा दाखल होईल सांगली जिल्ह्यातील कोणत्याही कंटेनमेंट झोनमधील मद्यविक्री दुकानांचे व्यवहार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली नाही. तसेच वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या कंटेनमेंट झोनमधील मद्यविक्री दुकानांचे व्यवहारात तात्काळ बंद करण्यात येतील.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close