इस्लामपूर येथील कंन्टेंन्मेंट झोनची अधिसूचना रद्द : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली : कोव्हिड 19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने इस्लामपूर शहरातील मध्यभागी दि.13 मार्च 2020 पासून कंन्टेन्मेंट झोनची अमंलबजावणी करण्यात आली होती. त्यास 43 दिवस पूर्ण झाले आहेत. सदर बाधित क्षेत्रातील शेवटची पाझीटीव्ह केस दि. 4 एप्रिल 2020 रोजी निदर्शनास आली असून तदनतंर एकही नवीन रूग्ण् आढळून आला नाही. त्या नतंर सलग 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे इस्लामपूर येथील कंन्टेंन्मेंट झोनची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
इस्लामपूर नगरपालिका हद्दीत कोरोना बाधित रूग्ण् आढळून आलेले होते. त्या ठिकाणी तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये इस्लामपूर नगरपरिषद हद्दीत कन्टेंन्मेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते.