भिलवडी : आज दि.४/५/२०२० रोजी भिलवडी येथे आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की, भिलवडी गावातील हॉटेल,पानपट्टी, चहा टपरी, नाष्टा सेंटर, हातगाडी वगळून इतर सर्व दुकाने उघडणेसाठी सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात येत आहे. दुपारी बारा नंतर दुकान चालू राहिलेस संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. दुकानांमध्ये कमीत कमी पाच लोक उभे राहतील याची काळजी घ्यावी, सर्वांनी मास्कचा वापर करावा,दुकानदाराने मास्क चा वापर करावा, बाहेर येणार्या लोकांनी नोंद ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करावी ही विनंती
*स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती भिलवडी*
Share