ताज्या घडामोडी

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 82 हजारांची मदत

सांगली : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने कोरोना निर्मुलनासाठी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पवार व व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्हा समन्वयक आणि महामंडळाचे कर्मचारी यांच्या वतीने एकूण 82 हजाराची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आली.
सर्व जिल्हा समन्वयक आणि मुख्य कार्यालयातील कर्मचारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 82 हजार रूपये जमा केल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close