महाराष्ट्र

कोल्हापूरातील शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळाच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य नवरात्र उत्सवास प्रारंभ

 

कोल्हापूरःअनिल पाटील

वाद्यांच्या गजरात… विद्युत रोषणाईमध्ये धार्मिक व प्रसन्न वातावरणात शाहूपुरी बॉईज कला, क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवा उत्सवात प्रारंभ झाला. यावेळी देवीचा आगमन सोहळा महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन पहिल्या महीला आमदार जयश्री चंद्रकांत जाधव तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सौ.श्वेता पाटील यांची प्रमुख उपस्थितीत पार पडला. संपूर्ण नवरात्र उत्सवाच्या आयोजिका पूनम राकेश (गणेश) काटे असून दरवर्षी हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. पण कोरोनानंतर निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव साजरा होत आहे.

त्यामध्ये नवरात्रातील नऊ दिवस भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. रास दांडिया, श्रीसूक्त पठण, कुंकूमार्चन सोहळा, नवचंडी महायज्ञ सोहळा, माता पायपूजन सोहळा,विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मुलींसाठी दांडिया स्पर्धा, लहान मुलामुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, दररोज रात्री साडे आठ वाजता आरती व राष्ट्रगीत असणार आहे.भागातील महिला मुलींसाठी रोज रास दांडिया, स्पोर्ट गेम्स आणि रोज लकी ड्रॉ मध्ये मानाची साडी आणि उल्लेखनीय सहभागासाठी हॉटेल चे फॅमिली पास मिळवण्याचा मान महिला वर्गाला मिळणार आहे.तसेच लकी ड्रॉ मधील विजेत्यास दोन व्यक्तींसाठी कोल्हापूर तिरुपती विमान तिकीट मोफत मिळण्याची संधी उपलब्ध असणार आहे. तरी सर्वात मोठा भव्य नवरात्र उत्सव साजरा करणारे शाहूपुरी बॉईज क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक मंडळ हे एकमेव मंडळ आहे. तरी या उत्सवांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी कीर्ती खाडे, स्वाती चोरगे, पूजा आरेकर, अर्चना मेढे, सुजाता नलवडे, ललिता शिंदे यांचे सहकार्य लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close