ताज्या घडामोडी

कटलेला पतंग मिळविण्याच्या नादात उचगाव येथील खनित बुङालेल्या शाळकरी मुलाचा मृतदेह आज सापङला

 

कोल्हापूरःअनिल पाटील

कटलेला पतंग मिळवण्याच्या नादात मित सचिन भंडारी (वय ११ रा. दोस्ती ग्रुप जवळ उचगाव ता.करवीर) या शाळकरी मुलाचा शनिवारी खणीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. (उचगांव ता.करवीर ) येथे पुणे बेंगलोर महामार्गावर ंसाई पेट्रोल पंपानजीक खणीत शनिवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली होती. त्याचा मृतदेह आज मिळून आला .
करवीर तालुक्यातील उचगाव इथल्या दोस्ती ग्रुप परिसरात सचिन भंडारी सहकुटुंब राहतात.
शनिवारी सायंकाळी पतंग उडविण्याचा आनंद मुले घेत होती.कटलेला पतंग मिळविण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत होते मात्र हाच प्रयत्न अंगलट येवून एका शाळकरी मुलाला जीव गमवावा लागला.अतिशय हुशार असलेल्या मीतही कटलेला पतंग मिळवण्याच्या प्रयत्नात खणीच्या पाण्यात पडला व त्यातच त्याचा गढूळ पाण्यात बुडून मृत्यू झाला. बेपत्ता झालेल्या मितला शोधण्यासाठी शनिवारी सायंकाळी आई वडील, मित्र, नातेवाईक ,पोलीस यांनी खूप प्रयत्न केले.मात्र अंधारामुळे त्यात यश आले नाही.रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली.सकाळी नऊ वाजता खणीत मितचा मृतदेह तरंगत असल्याचे पोलिसांना आढळून आला.यावेळी मृत मीतच्या हातात पतंगाची दोरी व पतंग होता. मीतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आला.यावेळी त्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केल. मृतदेह घरी आणल्यावर आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
मीतच्या जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.मीत वर अंत्यसंस्कार रविवारी दुपारी उचगाव येथे करण्यात आले.मित मीच हा कोल्हापुरातील खाजगी शाळेत इयत्ता पाचवी मध्ये शिकत होता. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार राजू चव्हाण करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close