महाराष्ट्र

चंद्रे येथे आठ दिवसांपूर्वी बांधावरून वैरणीचा भारा घेवून पडलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्याण मृत्यू

 

कोल्हापूरःअनिल पाटील

चंद्रे ( ता. राधानगरी ) येथे आठ दिवसापूर्वी बांधावरून र्वेरणीचा भारा घेवून पङलेल्या शेतकर्‍याचा आज कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात उपचारा दरम्याण मूत्यू झाला. दत्तात्रय ईश्वरा हळदकर(वय 68) असे त्यांचे नाव आहे. या घटनेमूळे गावावर र्शोककाळा पसरली आहे.
आठ दिवसापूर्वी ते वैरणीचा भारा घेवून जनावरांच्या गोठ्याकडे जात असताना उंच बांधावरून पाय घसरल्याने वैरणीचा भारा अंगावर पडल्यामूळे त्यांच्या मणक्याला मोठी इजा झाली होती. आज त्यांची प्रकूती खालावल्याने त्यानां कोल्हापूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सूरू आसतानां दूपारी त्यांचा मूत्यू झाला. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
दत्तात्रय पाटील हे कष्ठाळू शेतकरी होते.त्यांचा दूग्ध व्यवसाय चांगला होता ते दररोज जनावरांना वैरण आणत होते. नेहमीप्रमाणे वैरणीचा भारा घेवून जात असताना त्या दिवशी ऊन पावसामुळे बांधावर दलदल झाल्याने तेथून जात असताना अचानक पाय निसटला आणि गंभीर दुखापत झाली होती. गावातील सामाजिक, धार्मिक ,कार्यात अग्रेसर असायचे.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुले,पुतणे,नातू असा परिवार आहे रक्षा विसर्जन शुक्रवार दि 23 रोजी सकाळी आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close