महाराष्ट्र

बांधकाम क्षेत्रातील कामगारांनी विविध प्रकारच्या कल्याणकारी मंडळाकडून योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हा उपाध्यक्ष काॅम्रेड संदीप सुतार यांचे आवाहन

 

 

कोल्हापूरःअनिल पाटील

*बांधकाम क्षेत्रातील कामगारांनी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळच्या विविध प्रकारच्या योजनेचा लाभ घेण्याकरिता मंडळाकडे नोंदीत होणे गरजेचे आहे.योजनपासून अनेक बांधकाम क्षेत्रातील कामगार अजून वंचित राहिले आहेत.लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक गावागावांतमध्ये या योजना कामगारांपर्यत पोचण्याचे काम केलेले आहे,अनेक वर्षे झाली ही संघटना कामगारांच्या प्रश्नावर संदर्भात आंदोलन,मोर्चाचे करुन विविध प्रकारच्या योजना कामगारच्या हातामधी द्यायचे काम करत आहे.कामगारांच्या मुला-मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती पहिली ते सातवी.२५००/ रुपये,आठवी ते दहावी ५०००/ रुपये,दहावी व बारावी मध्ये ५० टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यानंतर १००००/रुपये,व दहावी व बारावी शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी १००००/रुपये, प्रथम,द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी २००००/रुपये,वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी १०००००/रुपये,व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी ६०००००/रुपये,पदीव्युत्तर २००००/रुपये,पदविकेकरिता २५०००/रुपये,नोंदीत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसुतीसाठी १५०००/रुपये,शस्त्रकियेद्रवारे प्रसुतीसाठी २००००/रुपये,घरासाठी २ लाख,एम एस सी आय डी ४०००/रुपये,नोंदीत बांधकाम कामगारांच्या पहिल्या विवाहासाठी ३० हजार रुपये,नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या पहिल्या विवाहासाठी ५१ हजार रुपये,सुरक्षा संच किट व अत्यावश्यक संच.या व इतर अनेक प्रकारच्या कल्याणकारी मंडळाकडून योजना आहे.तरी बांधकाम कामगारांनी नोंदीत होणे गरजेचे आहे.अशी माहिती कार्यक्रमाच्या वेळी काॅमेड सुतार यांनी दिली आहे.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close