महाराष्ट्र

आसुर्ले पोर्ले येथे कृषीदिनानिमित्त शेतकर्‍यांचा सन्मान

कोल्हापूरःअनिल पाटील

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आसुर्ले पोर्ले ता पन्हाळा जि कोल्हापूर येथे महाराष्ट्र कृषिदिनानिमित्त कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या परिसरातील शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाचे उदघाटन एन डी चौगुले ग्रुप इन्स्टिट्युशन्सचे अध्यक्ष व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे कार्यकारी परिषद सदस्य प्रा एन डी चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ डी वाय पाटील कृषी महाविद्यालय व कृषी विज्ञान केंद्राचे प्रा सुनील सूर्यगंध प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य प्रा आर व्ही देवठाणेकर होते. तर संस्थेचे उपाध्यक्ष श्री भाऊसो पाटील सर, संचालिका सौ शारदा लव्हटे मॅडम, उपप्राचार्य प्रा व्ही बी तळेकर सर यांची कार्यक्रमास उपस्थितीत होते. संस्थेचे कार्यकारी संचालक श्री प्रतीक चौगले सर, सहसचिव प्रा ए. ए. घाडगे , सचिव श्री एस एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अायाेजित करण्यात अाला हाेता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचा प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर सर्व प्रमूख पाहूण्यांचा शाल, श्रीफळ व साप्ताहिक झेपचा अंक देऊन गौरव करण्यात आला.
यानंतर कार्यक्रमास उपस्थित असलेले सन्माननीय शेतकरी श्री शशिकांत आनंदा पोवार माजगाव, श्री सुहास बंडू पाटील कोतोली, श्री महेश विश्वास पाटील कोतोली, श्री महादेव कृष्णा अडकूर पोर्ले, श्री सहदेव कृष्णा भोपळे पोर्ले, श्री राहुल कृष्णात सावंत माजगाव, अनुबाई महादेव भोपळे , उज्ज्वला दत्तात्रय जाधव, दिपाली राहुल कारंडे, श्री गजानन तुकाराम संकपाळ, श्री युवराज चौगुले घोटवडे, श्री संजय सदाशिव कदम पडळ यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, साप्ताहिक झेपचा अंक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याने सर्व शेतकरी भारावून गेले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या इतिहास विभागप्रमुख सहा प्रा आर एस पाटील मॅडम यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश विशद केला.
प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ डी वाय पाटील कृषी महाविद्यालय व कृषी विज्ञान केंद्राचे प्रा श्री सुनील सूर्यगंध यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात फायद्यातोट्याचा विचार करूनच पीक व्यवस्थापन करायला हवे असे सांगताना एकरी उत्पादन व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ कसा घालावा यावर्षी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर सत्कारमूर्ती शेतकरी श्री सुहास पाटील यांनी आपले मनोगत ग्रामीण ढंगाच्या रांगड्या भाषेत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी त्यांना कृषी क्षेत्रात आलेले अनेक अनुभव कथन केले. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे कार्यकारी परिषद सदस्य प्रा एन डी चौगुले सर यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात शेतीचे अर्थकारण उदाहरणांच्या साहाय्याने पटवून देतानाच पशुपालन, दुग्धव्यवसाय व वैरण शेती याविषयीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रा चौगुले यांच्या भाषणानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्र प्राचार्य प्रा आर व्ही देवठाणेकर सर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित सर्व शेतकर्‍यांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा देतानाच कृषी क्षेत्रातील त्यांना आलेले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा प्रा डी ए निरुखे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सहा प्रा एस जे लगारे मॅडम यांनी केले. छायाचित्रणाची जबाबदारी श्री सचिन सुतार सर यांनी पार पाडली.
कार्यक्रमास अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या प्रमुख सहा प्रा एन ए इंगवले मॅडम, प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक व हुतात्मा नंदकुमार पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्र प्राचार्य प्रा एस डी कुंभार सर, कै बनाई चौगुले कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्र प्राचार्य प्रा कुंभार मॅडम व जनसंपर्क अधिकारी श्री मुरलीधर कुलकर्णी यांच्यासह महाविद्यालयाच्या सर्व विद्याशाखांचे प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close