महाराष्ट्र

लोटेवाङीत उत्तरकार्याला बगल देवून शालेय साहित्याचे वाटप  : साठे परिवाराचा उपक्रम

 

कोल्हापूरःअनिल पाटील

कोल्हापुरातील गोखले कॉलेजचे माजी प्राचार्य शिवाजीराव साठे  रा. लोटेवाडी (ता भूदरगड) यांचे  चिरंजीव आत्माराम साठे यांचे  अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यामुळे साठे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांनी  उत्तरकार्याच्या कार्यक्रमाला बगल देऊन  विद्या मंदिर लोटेवाडीच्या शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले. या वेळी मुलांना वह्या,पेन,व अंगणवाडी च्या मुलांना खाऊच्या प्लेटा वाटप तसेच शालेय साहित्य ठेवण्यासाठी तिजोरो भेट देण्यात आली.
या वेळी बोलताना पर्यवेक्षक सर्जेराव साठे म्हणाले की,ज्या काळात शिक्षण म्हणजे काय हे आम्हास माहीत नव्हते. त्यावेळी आमच्या आई- वडिलांनी आम्हा चारही  भावडांना  शिकवून   पदवीधर केले. खूप हालाकीच्या परिस्थितीत वर मात करून आम्ही शिकलो.तुम्ही अभ्यास करून मोठे व्हा.
या वेळी गटशिक्षण अधिकारी दीपक मेगाने  म्हणाले की, साठे कुटूंबावरील दुःख खूप मोठे आहे. पण त्याचे  शिक्षणावरील  प्रेम कधी कमी झाले  नाही. त्यानी पारंपरिक उतरकार्यला बगल देऊन गावातील  मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावला ही कौतुकाची बाब आहे.दिलेल्या वह्या ह्या शिक्षणा साठी न वापरता पेपर मधील सुविचार कट करून त्या वहीत चिकटून ठेवण्यासाठी करावा ते विद्यार्थ्यांना जीवनभर उपयोगी पडतील.
यावेळी सरपंच प्रतिनिधी सातापा परीट,गट शिक्षण अधिकारी दीपक मेंगाने,विस्तार अधिकारी प्रमोद  कांबळे,उपसरपंच तानाजी साठे,पोलीस पाटील शांताराम भलेकर,मुख्यध्यपक सोकासने,माजी सरपंच एम.जी.सारंग.धनाजीराव साठे,ग्राम पंचायत सदस्य संजय कांबळे,दिगंबर पाटील,दिनकर साठे शिक्षक कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close