मलकापूर ग्रामीण रूग्णालयचा वैद्यकीय अधिकारी ङाॅ. आशितोष तराळ याला 5000 हजार रूपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केले जेरबंद

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार हे आज सेवानिवूत्त होत असून त्यांच्या सेवानिवूत्ती नंतरच्या लाभाचा प्रस्ताव पूणे कार्यालयाकङून मंजूर होवून आल्यानंतर पूढील कार्यवाही करण्यासाठी तसेच इतर प्रलंबित असलेली पूरवणी बिले विनात्रूटी पूढे पाटविण्यासाठी 5000 हजार रूपये व वरिष्ठांच्या सेवानिवूत्तीच्या निरोपसमारंभाकरिता 7000 हजार रूपये असे एकूण 12000 हजार रूपयांची तक्रारदाराकङे मागणी करूण आज ङाॅ. आशितोष अरूण तराळ वय (38) र्वेदकिय अधिकारी वर्ग 1 ग्रामीण रूग्णालय मलकापूर.ता.शाहूवाङी यांनी सेवानिवूत्तीच्या कामाचे 5000 हजार रूपये तक्रारदाराकङून घेतानां लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकङले.
ही कारवाई पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बूधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. नितीन कूंभार”ए.एस.आय संजीव बंबरगेकर”पो.ना. विकास माने”पो.काॅ. रूपेश माने “पो.हे.काॅ. सूरज माने यांनी केली