महाराष्ट्रसांगली

अवैध व्यवसायांना आळा घालण्यास विटा पोलिस दल सक्षम : संजय विभुते

 

विटा/

शिराज शिकलगार

 

विटा शहरामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये डान्सबार, वेश्या व्यवसाय व इतर अनाधिकृत व्यवसायासंबंधी मोठया प्रमाणामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करुन त्यांची बदनामी करण्याचे काम मोठया प्रमाणात सुरु आहे. याबाबतीत आम्ही सर्व सत्यता पडताळणी केलेली आहे. परंतु असा कोणताही अनाधिकृत व्यवसाय पुराव्यासह निदर्शनास आलेला दिसत नाही. काही फोटो व व्हिडीओ क्लिपमध्ये छेडछाड करुन विटा परिसरामध्ये असे अनाधिकृत व्यवसाय चालू असल्याबाबत खुलासा करण्याचा किंवा बिनबुडाचे आरोप करण्याचा जो कल्पोकल्पीत अवाजवी प्रयत्न केलेला आहे. तो पुर्णपणे खोटा व चुकीचा असून पोलीसांची नाहक बदनामी करणारा आहे. विटा पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा पोलीसप्रमुख अतिशय सक्षमपणे व पारदर्शीपणे काम करीत असून अशा पध्दतीने बदनामी झाल्यास त्यांचे खच्चीकरण व्हायला वेळ लागणार नाही. अवैध व्यवसायांना आळा घालण्यास विटा पोलीस दल व सांगली जिल्हा पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे
केले आहे.
दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सध्या विटा शहरामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये डान्सबार, वेश्या व्यवसाय व इतर अनाधिकृत व्यवसायासंबंधी मोठया प्रमाणामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करुन त्यांची बदनामी करण्याचे काम मोठया प्रमाणात सुरु आहे. याबाबतीत आम्ही सर्व सत्यता पडताळणी केलेली आहे. परंतू असा कोणताही अनाधिकृत व्यवसाय पुराव्यासह निदर्शनास आलेला दिसत नाही. काही फोटो व व्हिडीओ क्लिपमध्ये छेडछाड करुन विटा परिसरामध्ये असे अनाधिकृत व्यवसाय चालू असलेबाबत खुलासा करणेचा किंवा बिनबुडाचे आरोप करण्याचा जो कल्पोकल्पीत अवाजवी प्रयत्न केलेला आहे. तो पुर्णपणे खोटा व चुकीचा असून पोलीसांची नाहक बदनामी करणारा आहे. संबंधित असे कोणतेही अनाधिकृत व्यवसाय असतील तर त्याची माहिती पोलीसांना देणेच्या ऐवजी प्रसिध्दी माध्यमांपुढे आणल्यास अशा अनाधिकृत व्यवसाय करणाऱ्यांना मदत केल्यासारखे होत असून संबंधित तक्रारदारांना अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे. ते ऐकत नसतील तर ती माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांचेकडे देणे गरजेचे आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने एका महिलेच्या गळयातील सोन्याचा दागिना, तिच्या मुलाने तिच्या परस्पर एका वेश्येसाठी विकून आपल्या शरीराची भूक भागविली आहे असा आरोप
केलेला आहे. आमचे पोलीस अधिकारी यांना आवाहन आहे की, असे घडले असेल तर ते माणुसकीला काळीमा फासण्यासारखे आहे. याची सुध्दा सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या सामाजिक कार्यकर्त्याने हा आरोप केलेला आहे त्याला बोलावून ती महिला कोण, तिचा मुलगा कोण व ज्या वेश्येसाठी हे सोने विकले तो दुकानदार, ती महिला, ज्या लॉज तो गेला तो संबंधित लॉजधारक, या सर्वाची चौकशी होवून दोषींना कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आम्ही या माध्यमातून सर्व विटेकरांना आवाहन करतो, जाणीवपुर्वक विटा शहराची बदनामी कोणी करीत असेल तर त्याला व त्या अफवेला आपण बळी पडू नये. आपल्या आजुबाजुला कोणताही अनाधिकृत व्यवसाय चालू असेल, त्याची माहिती विटा पोलीस ठाण्यात आपण द्यावी. आपल्या नावाची गुप्तता पाळण्यात येईल व आपल्याला संरक्षण देण्याची भुमिका राज्य सरकारची असेल. सुरळीत चाललेले महाविकास आघाडी सरकार हे काही लोकांना बघवत नसल्यामुळे बदनामी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अशा गोष्टी लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून निर्माण केल्या जातात की काय ? हा आमच्या पुढे पडलेला प्रश्न आहे. विटा पोलीस स्टेशन, त्यामधील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा पोलीसप्रमुख अतिशय सक्षमपणे व पारदर्शीपणे काम करीत असून अशा पध्दतीने बदनामी झाल्यास त्यांचे खच्चीकरण व्हायला वेळ लागणार नाही. अवैध व्यवसायांना आळा घालण्यास विटा पोलीस दल व सांगली जिल्हा पोलीस दल सक्षम असून अनाधिकृत व्यवसायांना आळा घालण्याचे काम केले जाईल. जाणीवपुर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने कोणी हे काम करीत असेल तर लवकरच विटा येथे पोलीस समर्थकांची बैठक घेवून पुढील दिशा ठरविली जाईल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close