लोकसेवा महासंघाच्या महिला आघाडीच्या राज्य संपर्क प्रमुखपदी उज्वला झेंडे यांची निवङ

कोल्हापूर ं अनिल पाटील
लोकसेवा महासंघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेची कोल्हापूर शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती .यावेळी राज्यातील विविध पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या .
यामध्ये महिला आघाडीच्या राज्य संपर्कप्रमुखपदी उज्वला झेंडे, दीपा मोटे उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी ,अर्जुन बुचडे अध्यक्ष कोल्हापूर शहर ,वाहतूक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत खर्चे ,लखन कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष कामगार आघाडी ,अजित गायकवाड अध्यक्ष पन्हाळा तालुका, मुनेरा जमादार सांगली जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, कल्पना चव्हाण अध्यक्ष उचगाव शहर महिला आघाडी, मीना सकटे सरचिटणीस कोल्हापूर शहर, श्रीधर निळकंठ जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी ,अविनाश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष कामगार आघाडी, यांना निवडीचे पत्र संस्थापक व राज्य अध्यक्ष उत्तमराव कागले यांनी दिले
लोकसेवा महासंघ ही राजकारण विरहित सामाजिक संघटना असून विविध उपक्रम राबवणे ,शासकीय योजनांचा गोरगरीब लोकांना फायदा करून देणे ,भ्रष्टाचारविरोध लढणे ,अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे ,कामगारांचे प्रश्न सोडवणे ,महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणे ,कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ मिळवून देणे, महापूर ,कोरोना सारख्या आपत्ती काळात लोकांना मदत करणे ,मोफत आरोग्य शिबिर भरवणे, कला व क्रिडा स्पर्धा घेणे ,विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांचापुरस्कार देऊन सन्मान करणे असे अनेक उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून राबवले जातात .लोकसेवा महासंघाच्या गेल्या 12 वर्षातील अनेक सामाजिक उपक्रमामुळे महिला वर्ग,तरुण वर्ग संघटनेकडे आकर्षित होत आहे .या संघटनेच्या महिला आघाडी, युवक आघाडी, कामगार आघाडी, बांधकाम कामगार आघाडी ,शिक्षक आघाडी अशा वेळेवर या आघाडीची बांधणी चालू असून यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पदाधिकारी नेमणूक चालू आहे. वरील पदाधिकारी निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .
ज्यांना समाजकार्याची आवड आहे अशाने या संघटनेत सामील होण्यासाठी 7972717438, 9665306444 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन संघटनेचे संस्थापक व राज्य अध्यक्ष उत्तमराव कागले यांनी केले आहे
यावेळी नेहा नलवडे अध्यक्ष अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी , राजश्री बेनाडी महिला आघाडी करवीर तालुका उपाध्यक्ष , बानू पठाण अध्यक्षा महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र , विद्या झेंडे सरचिटणीस इचलकरंजी शहर, मुस्तफा सय्यद जिल्हाध्यक्ष यंत्रमाग कामगार आघाडी, बाबासाहेब बनसोडे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष संदीप खोत अध्यक्ष कागल तालुका ,प्रभाकर थोरात उपाध्यक्ष कागल तालुका, जितेंद्र शिंदे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वाहतूक आघाडी, विनोद व्हराटे अध्यक्ष शिरोळ तालुका, श्रीकांत कमलाकर अध्यक्ष शिरोळ तालुका कामगार आघाडी ,अशोक सुतार जिल्हाध्यक्ष बांधकाम कामगार आघाडी ,दीपाली पवार कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस महिला आघाडी ,इत्यादी निवडीवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.