सांगली
बिसूरचे प्रकाश रेवडे यांचे निधन

, सांगली : बिसुर गावचे माजी सरपंच, श्री हनुमान व्यायाम मंडळाचे माजी खेळाडू,आमचे परममित्र प्रकाश हिंदुराव रेवडे यांचं काल रात्री सातच्या दरम्यान हृदय विकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झालं.
ते सरपंचपदी असताना गावच्या विकासासाठी त्यांनी मोलाचं योगदान दिले होते.त्यांच्या स्वभावामुळे ते बिसुर पंचक्रोशीत खूप प्रसिद्ध होते.माधनगर येथे त्यांचा मुद्रा फोटो स्टुडिओ असुन फोटो ग्राँफी व्यवसायात त्यांचं मोठं नाव होतं.त्यांचा मोठा मित्र परिवार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,आई वडील,भाऊ, बहीण,असा मोठा परिवार आहे.
रक्षा विसर्जनाचा विधी उद्या रविवार दि.१५/५/२०२२ रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास बिसुर येथे होणार आहे.
Share