महाराष्ट्र

कोल्हापूर येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी चेतवले हिंदू राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिगं !

कोल्हापूरःअनिल पाटील

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे १२ मे २०२२ या दिवशी हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिगं चेतवले गेले. या फेरीत वारकरी वारकरी संप्रदाय, श्री संप्रदाय, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, ‘इस्कॉन’, भजनी मंडळ, योग वेदांत समिती, शिवसेना, युवा सेना, पतित पावन संघटना, यज्ञ बहुउद्देशीय ट्रस्ट कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ यांसह विविध संप्रदाय यांसह मोठ्या संख्येने हिंदू सहभागी होते. या फेरीसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक संत सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती.
हिंदू एकता दिंडीला मिरजकर तिकटी येथे धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे यांच्या हस्ते धर्मध्वजपूजनाने प्रारंभ झाला. या प्रसंगी सनातन संस्थेचे संत पू. सदाशिव(भाऊ) परब, पू. डॉ. श्रीमती शरदिनी कोरे, पू. श्रीमती मंदाकिनी डगवार, यांचीही वंदनीय उपस्थिती होती. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या पालखीचे पूजन धर्मप्रेमी सौ. आसावरी एरंडे यांनी, तर श्री महालक्ष्मी देवीच्या पालखीचे पूजन धर्मप्रेमी सौ. सुगंधा गायकवाड यांनी केले. यानंतर दिंडीला प्रारंभ झाला. खरी कॉर्नर, महाद्वार रोड, गुजरी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पापाची तिकटी मार्गे गंगावेस येथे सांगता झाली.
दिंडीच्या समोर धर्मध्वज, मागे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र आणि श्री महालक्ष्मी देवीची चैतन्यदायी पालखी, पालखीच्या दोन्ही बाजूंनी नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनींचे नऊवारी कलश पथक, स्वरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवणारी स्वरक्षण पथके, बाल साधक कक्ष, प्रथमोपचार पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखवणारे ‘रणरागिणी’ पथक, टाळ-मृदंग घेतलेले वारकरी पथक, असे दिंडीचे स्वरूप होते. दिंडीमध्ये हातात झेंडे घेऊन विविध घोषणा देत सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि विविध संप्रदाय यांचे अनुयायी सहभागी झाले होते.

दिंंडीचे जात असतांना तिचे वाटेत धर्मध्वजाची आरती ओवाळून, तसेच पुष्पवृष्टी करून अनेकांनी स्वागत केले. दिंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनाधिष्ठीत मूर्ती असलेला रथ सर्वांचे आकर्षण ठरला. या रथामुळे सर्वांची क्षात्रवृत्ती जागृत होऊन सर्वांनी उत्स्फूर्तपणे विविध घोषणा दिल्या. दिंडी चालू झाल्यावर अनेकांनी या रथाचे भ्रमणभाषमधून छायाचित्रे काढून ती इतरांना पाठवली.
समारोपप्रसंगी दिंडीच्या समारोपप्रसंगी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘आतंकवाद कसा संपवला पाहिजे, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांचे विचार आणि कृती यांतून दाखवून दिले आहे. या दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता आहे.’’सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे म्हणाले, ‘‘घटनादुरुस्तीद्वारे जर भारताला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र बनवता येते, तर अशा घटनादुरुस्तीच्या माध्यमातून भारत हे ‘हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ? त्यामुळे हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा हिंदूंना संवैधानिक अधिकार आहे. आपण प्रत्येक जण विचारांचे दान, कौशल्याचे दान, वेळेचे दान, तसेच शरीर आणि मन यांचे दान देऊन धर्मसंस्थापनेतील वाटा उचलावा, असे आवाहन मी या निमित्ताने करतो.’’ हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या सौ. मेघमाला जोशी यांनी केले. या दिंडीच्या माध्यमातून कोल्हापूर शहर भगवेमय झाले होते आणि दिंडीच्या निमित्ताने सनातनवरील विश्‍वास परत एकदा दृढ झाला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close